आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Bride Ran Away From Her Marriage To Meet Vikrant Messi On The Set Of Film 'chapaak'

जेव्हा विक्रांत मेसीला भेटण्यासाठी आपल्या लग्नातून पळून आली होती एक नवरी, सेटवर करत राहिली गोंधळ 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : विक्रांत मेसी डायरेक्टर मेघना गुलजारचा चित्रपट 'छपाक'मध्ये दीपिका पादुकोणसोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर त्याच्यासोबत एक विचित्र घटना घडली. झाले असे की, एक नवरी आपल्या लग्नातून पळून सेटवर आली होती आणि तिने तेथे खूप गोंधळ केला. रिपोर्ट्सनुसार, प्रकरण 6 जूनचे आहे. त्यावेळी चित्रपटाचे शूटिंग दिल्लीच्या साकेत भागात सुरु होते.  

 

सुरक्षा व्यवस्था तोडून आत आली नवरी... 
रिपोर्ट्समध्ये लिहिले गेले आहे की, "संध्याकाळच्या शॉटसाठी टीमने सेटवर कडक सुरक्षा व्यवस्था केली होती. तरीही मुलगी नवरीच्या वेशात सेटवर पोहोचली आणि गोंधळ करू लागली. ती सतत रडत होती आणि विक्रांतला भेटण्याची मागणी करत होती. ती कुणाचेच काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. बस ती एवढेच म्हणत होती की तिला लग्न करायचे नाही."

 

विक्रांत समजावून समजावून हरला.. 
सूत्रांनी पुढे सांगितले, "पूर्ण एक तास ती मुलगी जागची हलली नाही तर विक्रांत तिच्यासोबत बसला, तिच्याशी बोलला आणि तिला वेन्युवर परतण्यासाठी समजावू लागला. मात्र त्याचे सर्व प्रयत्न विफल ठरले. शेवटी सिक्युरिटी टीमने मध्यस्ती करत पोलिसांना सेटवर बोलावले."

 

या घटनेमुळे स्तब्ध झाला होता विक्रांत... 
या घटनेमुळे विक्रांत खूप जास्त डिस्टर्ब् झाला होता. त्याने एका इंग्रजी न्यूज वेबसाइटसोबत बोलताना सांगितले की, त्यावेळी त्याला समजत नव्हते की, काय करावे. मात्र तो तरीही विनम्र राहिला. त्याला हे सुनिश्चित करायचे होते की, मुलीने तिचे लग्न सोडून पळू नये आणि सुरक्षित घरी पोहोचावे. नंतर साकेत पोलिसांनी महिलेला घरी तर पोहोंचवले, पण शूटिंग सुमारे चार तास थांबलेले होते. 

 

अॅसिड अटॅक सर्वायव्हर लक्ष्मीची कहाणी... 
चित्रपटाची कथा अॅसिड अटॅक सर्वायव्हर लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित आहे. दीपिका पदुकोण यामध्ये मालती (लक्ष्मीऐवजी मालती जे नाव वापरले गेले आहे.) च्या भूमिकेत दिसणार आहे. तर विक्रांत तिचा बिजनेस पार्टनर (नंतर लव्हर) आणि सोशल अॅक्टिविस्ट अमोलची भूमिका करणार आहे. चित्रपट पुढच्यावर्षी 10 जानेवारीला रिलीज होईल. 

बातम्या आणखी आहेत...