आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • A Bride Wears Tomato Jewellery Instead Of Gold Jewellery, Said, 'Don't Touch It, Otherwise I Will Kill You...'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरीने दागिन्यांऐवजी घातले टमाट्यांचे दागिने, म्हणाली - 'जीव घेईन हात लावाल तर...' 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही हसून हसून वेडे व्हाल. पाकिस्तानच्या लाहौरमध्ये एका नवरीने दागिन्यांऐवजी टमाटे परिधान केले होते. तिने टमाट्याचा नेकलेस, झुमके आणि बांगड्या घातल्या होत्या. डेली पाकिस्तानचा रिपोर्टर जेव्हा लग्नामध्ये पोहोचला तेव्हा नवरीने याचे विचित्र कारण सांगितले. ती म्हणाली, ''सोन्याचे भाव खूपच वाढले आहेत. टमाटे आणि पाईन नट (चिलगोजा) देखील खूप महाग झाले आहेत. त्यामुळे मी माझ्या लग्नाला सोन्याऐवजी टोमॅटोचे दागिने घातले आहेत.'' जेव्हा रिपोर्टर तिच्या टमाट्यांना हात लावतो. तेव्हा ती रागाने म्हणते, ''मारून टाकेल जर हात लावला तर. खूप प्रिय आहेत मला माझे टोमॅटो.'' नवरीने सांगितले की, हुंड्यामध्ये तिच्या आई वडिलांनी मुलाला तीन पेट्या टमाटे दिले आहेत. 

न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, पाकिस्तानमध्ये टमाट्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये टमाटे 300 रुपये किलोने विकले जात आहेत. 2 मिनिटांचा हा व्हिडिओ ट्विटरवर खूप व्हायरल होत आहे. ट्विटर यूजर नायला इनायतने हा व्हिडिओ शेअर केला आहे. लिहिले, ''जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही आयुष्यात सर्व काही पाहिले आहे तर ही टमाट्यांची ज्‍वेलरीदेखील पाहा.'' हा व्हिडिओ आत्तापर्यंत 32 हजार लोकांनी पाहिला आहे.