आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड-अहमदनगर मार्गावर धावत्या बसने घेतला पेट, जळून झाली खाक; सुदैवाने 34 प्रवासी बचावले

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडली घटना
  • चालकांच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे वाचले प्राण
  • सुदैवाने दुर्घटनेत जीवित हानी नाही

आष्टी - नांदेडवरून पुण्याला जात असलेल्या एका खाजगी लक्झरीला अचानक आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली. चालकांच्या प्रसंगवधानाने बसमधील 34 प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना आष्टी तालुक्यातील बीड-धामणगाव-नगर रोडवरील सांगवी पाटण येथे शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली.
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे शुक्रवारी पहाटे दोन वाजता 34 प्रवाशांनी भरलेली (एमएच 20  एन 9630) ही शर्मा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नांदेडवरून पुण्याकडे जात होती. दरम्यान बीड-धामणगाव-नगर रोडवर धावत्या बसने अचानक पेट घेतला. यामुळे एकच गोंधळ उडाला. परंतु, चालकांच्या प्रसंगवधानाने सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर पडले. यानंतर बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. नशिब बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत जीवित हानी झाली नाही अन्यथा चित्र वेगळे झाले असते. ही घटना घडताच काही मिनिटांत कडा पोलीस चौकीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र तो पर्यंत बस जळून खाक झाली होती. बसने पेट घेण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...