आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिमाचल प्रदेशातील कुल्लूजवळ 500 फुट खोल दरीत कोसळली बस, 25 जणांचा मृत्यू तर 35 पेक्षा जास्त गंभीर जखमी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कुल्लू(हिमाचल प्रदेश)- येथीस कुल्लूमध्ये गुरुवारी एक खासगी बस 500 फुट खोल दरीत पडली आहे. या अपघातात आतापर्यंत 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 35 जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांचे रेस्क्यू अभियान सध्या सुरू आहे. अपघात कुल्लूमध्ये बंजर परिसरातील भेउट वळणावर झाला. 

 

कुल्लूचे एसपी शालिनी अग्निहोत्री यांनी सांगितले की, बस कुल्लूवरून गाडागुशैणीकडे जात होती. एका वळणार बस 500 फुट खोल दरीत कोसळली. अपघात झालेल्या परिसरात नदी आहे, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनसाठी अडथळे येत आहेत. जखमींना पाठीवर टाकून आणले जात आहे.

 

रिपोर्टनुसार हा अपघात अंदाजे 4 वाजता झाला. त्या रस्त्यावरील ते वळण खूप भयंकर आहे. तिथे बसला मागे घेऊनच फिरवले जाऊ शकते. असे करतानाच बस दरीत कोसळली. बसमध्ये 60 लोक होते.

0