आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीएसटीच्या त्रासाला कंटाळून लघुउद्योजकाची आत्महत्या, वाळूज महानगर-1 मधील घटना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज/औरंगाबाद : सिडको वाळूज महानगर-१मध्ये साक्षीनगरीत राहणारे लघुउद्योजक विष्णू रामभाऊ काळवणे (५३, मूळ रा. फुलशेवरा, ता. गंगापूर) यांनी मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घरातच गळफास घेऊन अात्महत्या केली. काळवणे यांचा डब्ल्यू सेक्टरमध्ये भाड्याच्या गाळ्यात लघुउद्योग होता. काही महिन्यांपासून थकीत जीएसटी व मंदीमुळे त्यांना वैफल्य अाले हाेते. तशी चिठ्ठी पाेलिसांना सापडली अाहे. विष्णू काळवणे कुटूंबीयांसह २० वर्षांपूर्वी वाळूजमध्ये अाले. सुरुवातीला मिळेल ते काम करून नंतर त्यांनी डब्ल्यू-५२ सेक्टरमध्ये गणेश इंडस्ट्रीज या बफिंग शॉपला सुरुवात केली. येथे १० कामगार होते. काही दिवसांपासून मंदीमुळे ते अस्वस्थ होते. त्यातच शासनाकडून जीएसटीचा तगादा व नोटिसीद्वारे शेवटची २७ नोव्हेंबर तारीख देण्यात आल्याने काळवणे यांनी गळफास घेतल्याची माहिती समोर येत आहे.

मृत्यूपूर्वी मुलीला व्हाॅट्सअॅपवर मेसेज
काळवणे यांनी आपली विवाहित मुलगी रोशनी जाधवला (रा. पुणे) व्हाॅट‌्सअॅपवर आपण आत्महत्या करत असल्याची सुसाइड नोट घटनेपूर्वी सकाळी ९.५ वाजता पाठवली. हे वाचताच भेदरलेल्या मुलीने तत्काळ पंढरपूर येथे भावाला कळवले. काळवणे यांच्या पत्नी व मुलाने साक्षीनगरीत असलेल्या खोलीकडे धाव घेतली. मात्र, तोवर खूप उशीर झाला होता.

जीएसटीमुळे पहिलीच आत्महत्या
छाेट्या उद्याेजकांना अनेकदा बिले उशिरा मिळतात. मात्र, कामगारांचे वेतन थांबवता येत नाही. त्यामुळे खासगी कर्ज घेतले जाते. दुसरीकडे कुशल कामगार व जुन्या कामगारांना काढणे परवडणारे नसते. त्यात जीएसटीचा तगादा असतो. जीएसटीमुळे झालेली ही पहिलीच आत्महत्या असावी, अशी प्रतिक्रिया काही उद्योजकांनी दिली.