आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद येथील भाविकांच्या कारला अपघात; अभियंता ठार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 एरंडोल- जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ एसटी बस व कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप घाडगे ठार, तर ४ जण जखमी झाले.     
औरंगाबाद येथील शिवबाबांचे भाविक हे पहूरमार्गे  माउंट अबू येथे जात होते. त्यांनी फत्तेपूर येथील रहिवासी डॉक्टर किशोर पाटील यांना पहूर येथून सोबत घेतले. त्यानंतर एरंडोलमार्गे रवाना झाले.

 

सकाळी १० वाजेच्या सुमारास धुळे आगाराची विनाथांबा बस जळगावकडे जात होती आणि त्याने समोरून येणाऱ्या भाविकांच्या कारला जोरदार धडक दिली.  यात घाडगे यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही जखमी झाले.  

बातम्या आणखी आहेत...