आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- पुणे-मुंबर्इ द्रुतगती महामार्गावर कामशेत बाेगद्या जवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका ट्रकवर भरधाव वेगात पाठीमागील बाजूने कार धडकल्याने दाेन जणांचा जागीच मृत्यु झाला तर दाेनजण गंभीर जखमी झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजण्याचे सुमारास घडला.
मारुती भाऊ थाेरात (वय-70) अाणि एक महिला या अपघातात मयत झाले अाहेत. तर कारचालकासह दाेनजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता निगडी येथील लाेकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे.
मंगळवारी दुपारी मुंबर्इहून पुण्याचे दिशेला इंडिका कार (एमएच 14, जीएच 8239) येत हाेती. कामशेत बाेगद्या जवळ रस्त्याच्या कडेला एक कंटनेर (एमएच 46 एएफ0410) हा उभा हाेता. सदर कंटनेर ट्रकला इंडिका कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून पाठीमागील बाजूने भीषण वेगात धडकली. कार धडकल्यानंतर कारच्या पुढील बाजूचा चेंदामेंदा झाला, मात्र एअरबॅग उघडल्याने कारचालक व एक अन्य व्यक्ती बचावला गेला. मात्र, दाेनजणांचा भीषण अपघातात मृत्यु झाला अाहे. याबाबत पुढील तपास कामशेत पाेलीस करत अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.