Home | Maharashtra | North Maharashtra | Dhule | A case of abduction was registered for the missing woman

बेपत्ता झालेल्या तरुणीबद्दल अपहरणाचा गुन्हा दाखल

प्रतिनिधी | Update - Dec 20, 2018, 12:45 PM IST

मुलीच्या पालकांनी एकावर संशय व्यक्त केला

  • A case of abduction was registered for the missing woman

    धुळे : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचापासून जवळ असलेल्या मांडळ येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत दाऊळ येथूनही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. या मुलीच्या पालकांनी एकावर संशय व्यक्त केला आहे. दोन्ही घटनांविषयी दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मांडळ गावातील तरुणी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. याबाबत दोंडाईचा पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली होती. या विषयी पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार पंकज अरुण शिंदे याने अल्पवयीन मुलीला आमिष दाखवत पळवून नेले. त्यासाठी पंकजला दाैलत शिवाजी मिस्तरी, भाऊसाहेब निंबा पाटील, मनोहर निंबा पाटील, मण्या नामक तरुण, विशाल अरुण शिंदे, अरुण संतोष शिंदे यांनी मदत केली असा आरोप केला आहे. त्यावरून दोंडाईचा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    दुसऱ्या घटनेत दाऊळ गावातून अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाली आहे. गेल्या आठवड्यात ती रात्री आठ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेली होती. तिला विजय गणेश पवार याने पळविल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.

Trending