आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनहून चेन्नईला आलेल्या मांजरीला परत पाठवण्यासाठी अडून बसले बंदरावरील अधिकारी, पेटाने सांगितले - 'ती मरू शकते'

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

चेन्नई : चेन्नई बंदरावर एका मांजराने विचित्र परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. चेन्नई पोर्टच्या अधिकाऱ्यांना शंका आहे की, हे मांजर बिल्ली चीनहुन आलेल्या कंटेनरसोबत आली आहे. ती कोरोना व्हायरसने ग्रस्त असू शकते. त्यामुळे तिला चीनला परत पाठवावे. मात्र प्राण्यांच्या अधिकारांसाठी काम करणारी संस्था पेटा याला विरोध करत आहे. 
 
पेटा इंडियाच्या रश्मि गोखले यांनी चेन्नईच्या अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून सांगितले, ‘हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की मांजरींना कोरोनाव्हायरस संसर्ग होऊ शकत नाही किंवा त्या इतरांपर्यंत तो पसरवूही शकत नाहीत.’ त्यांनी सांगितले की, मांजर 20 दिवसांपूर्वी एका कंटेनरसोबत चेन्नई बंदरावर आली होती. तिला परत चीनला अपाठवल्यास तिच्या वाचण्याची शक्यता खूप कमी आहे.  

देशात 48 तासांत 10 केस... 

चीनपासून पसरलेले कोरोना व्हायरस 70 पेक्षा जास्त देशनमध्ये पोहोचले आहे. व्हायरसमुळे जगामध्ये 3 हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण आहे. मागील दोन दिवसांमध्ये याची 10 प्रकरणे समोर आली आहेत.