आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Collective Failure That The Victim Of Torture Could Not Get Justice : Priyanka Gandhi

अत्याचार पीडितेस न्याय मिळवून देता आला नाही, हे सामूहिक अपयश : प्रियंका गांधी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
छायाचित्र उन्नाव शहरातील आहे. महिला व मुलींनी अत्याचार पीडितेला न्याय मिळावा अशी सरकार व पाेलिसांकडे मागणी केली आहे. - Divya Marathi
छायाचित्र उन्नाव शहरातील आहे. महिला व मुलींनी अत्याचार पीडितेला न्याय मिळावा अशी सरकार व पाेलिसांकडे मागणी केली आहे.
  • पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात सामान्य नागरिकांमध्ये दु:ख व संतापाची लाट
  • मायावतींनी घेतली राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट
  • उन्नावमध्ये अश्रू थांबत नाहीत..गहिवरलेल्या स्वरात महिलांची न्यायाची मागणी

​​​​​​लखनऊ / उन्नाव : उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील अत्याचारपीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात दु:ख व संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षाने सुरक्षेच्या मुद्द्यावर राज्य सरकारला लक्ष्य केले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी शनिवारी नातेवाइकांची भेट घेतली. त्यानंतर ट्विट केले. उन्नावच्या आधीच्या घटनांना लक्षात घेऊन सरकारने पीडितेला तत्काळ सुरक्षा का पुरवण्यात आली नाही? एफआयआर दाखल करण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही का झाली नाही? उत्तर प्रदेशात दररोज अत्याचार होत आहेत. ते रोखण्यासाठी सरकार काय करत आहे? पीडितेला न्याय मिळवून देता आला नाही, हे सामूहिक अपयश आहे. सामाजिक पातळीवर आपण सर्व दोषी आहोत. ही घटना उत्तर प्रदेशातील कायदा-व्यवस्था पोखरल्या गेल्याचे निदर्शक असल्याची टीका प्रियंका यांनी ट्विटद्वारे केली. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी घटनेच्या विरोधात लखनऊमध्ये विधान भवनाच्या मुख्य द्वारासमोर धरणे धरले होते. आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांचा खात्मा करण्याची भाषा केली होती. परंतु एका लेकीला ते वाचवू शकले नाहीत, असे आरोप अखिलेश यांनी केले आहेत. कानपूरमध्ये सपा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. या वेळी पोलिसांनी अनेक सपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. बसपाप्रमुख मायावतींनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशात गुन्हेगारीचा आलेख वाढू लागला आहे. म्हणून राज्यपालांनी उन्नाव अत्याचार प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा. राज्यपाल महिला आहेत. त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी संविधानिक जबाबदारी निभावताना उत्तर प्रदेश सरकारला जागृत करण्याचे काम करावे. े, असे मायावतींनी ट्विट करून सांगितले. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या, दोषींना एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा द्यायला हवी. दोषसिद्धीनंतर गुन्हेगारास सहा महिन्यांत फाशी द्यायला हवी, या मागणीसाठी मालीवाल चार दिवसांपासून उपोषणावर आहेत.

फास्ट ट्रॅक कोर्टात १.६६ लाखाहून जास्त प्रकरणे प्रलंबित
 
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी उन्नाव प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्यात येईल, असे जाहीर केले. या निवाड्यांची वेग किती आहे हे जाणून घेऊया..


- फास्ट ट्रॅक कोर्टात अत्याचार व पॉक्सो कायद्यांतर्गत १,६६,८८२ प्रकरणे प्रलंबित.


- ३०.२% प्रकरणांचा एक वर्षात निपटारा.


- ३० % प्रकरणांासाठी १ ते ३ वर्षे लागली.


- ३०.९% प्रकरणे ३ ते १० वर्षे लागली.


- ८.९ % प्रकरणांत १० वर्षांहून जास्त वर्षे लागली. देशभरात १०२३ न्यायालयांची स्थापना केली जाणार


- प्रस्तावित ३८९ कोर्टात पॉक्सो कायद्याशी संबंधित प्रकरणांत सुनावणी
( हे सरकारी आकडे ३१ मार्च २०१८ पर्यंतचे)

जलदगती कशी आणणार?
 
- सरकारी वकिलाची नियुक्ती अर्धवेळ नव्हे, पूर्णवेळ असावी


- पोलिसांनी साक्षीदारांना िनयोजित वेळेत हजर करावे. कोर्टात साक्षीदार आल्यावर साक्ष त्याच दिवशी पूर्ण करावी


- आरोपीचा वकील कोर्टात न आल्यास जिल्हा विधी प्रशासनाने पर्याय द्यावा

- कोर्टाचा एफएसएल रिपोर्ट दोन महिन्यात उपलब्ध व्हावा
 
 
निर्भया प्रकरण : अखेर १ वर्ष ३ महिने २० दिवसांनंतर सरकारने दोषींना नोटीस दिली
 
निर्भया प्रकरणात ४ आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती. त्यापैकी तीन आरोपींनी फेरविचार याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिका ९ जुलै २०१८ मध्ये फेटाळून लावल्या. सरकार ९ जुलै २०१८ नंतर चारही दोषींना फाशी देऊ शकत होते. दया याचिका हा त्यांचा अधिकार नव्हता. एक वर्ष तीन महिन्यांनंतर २९ ऑक्टोबरला अखेर त्यांना नोटीस पाठवली. त्यात सात दिवसांत दया याचिका दाखल करावी, अन्यथा फाशी दिली जाऊ शकते. सात दिवसांनंतर चारपैकी एकाने दया याचिका दाखल केली. राष्ट्रपतींकडे ही याचिका दिल्ली सरकारकडे पोहोचली आहे. दिल्ली सरकारकडे २० दिवस राहिली. दिल्ली सरकारने ती २ डिसेंबरनंतर उपराज्यपाल, गृह खात्याकडे पाठवली. पुढे ही याचिका राष्ट्रपतींकडे गेली.

इतरांनाही गोळी घाला, आरोपीची पत्नी म्हणाली

हैदराबाद : हैदराबाद अत्याचार प्रकरणातील एका आरोपीच्या पत्नीने शनिवारी पतीच्या मृत्यूवर दु:ख व नाराजी व्यक्त केली. आरोपी चेन्नकेशावुलूची पत्नी रेणुका म्हणाली, चूक करणारे किती लोक तुरुंगात आहेत? त्यांनाही अशाच प्रकारे गोळी घातली पाहिजे. तुरुंगात बंद असलेल्या सर्व आरोपींना गोळी घातली जात नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाहीत. रेणुका यांचे वय १७ वर्षे असून त्या गरोदर आहेत. माझ्यावर अन्याय झाला आहे, असे रेणुका यांचे म्हणणे आहे. त्या नारायणपेठ जिल्ह्यातील मूळ गावी इतर गावकऱ्यांसह धरणे आंदाेलन करत आहेत. तुरुंगातील सर्वांना ठार करा, अशी मागणी त्यांनी केली.

डोळ्यांवर पट्टी बांधून रस्त्यावर..

सँटियागो : चिली, कोलंबिया, मेक्सिको, नेदरलँड, स्पेन, ब्रिटन, फ्रान्ससह अनेक दक्षिण अमेरिकी व युरोपातील देशात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या विरोधात शनिवारी रॅली काढण्यात आल्या. त्यात महिलांनी डोळ्यांवर पट्टी बांधून अत्याचाराचा निषेध केला. महिलांचा रंगमंच समूह लॅसटेसिसने अत्याचार प्रतिबंधक गीताची रचनाही केली. प्रत्येक रॅलीत महिला कार्यकर्त्या त्याचे सामूहिक गायन करतात. या गीताच्या आेळी- 'तुमच्या मार्गावर अत्याचारी' अशा आशयाच्या आहेत. हे गीत पहिल्यांदाच गेल्या महिन्यात चिलीतील देशव्यापी आंदोलनात गाण्यात आले होते. येथूनच महिला व अत्याचाराच्या विरोधात आंदोलन सुरू झाले होते. व्हायलन्स अगेन्स्ट वुमन संस्थेच्या मते चिलीमध्ये दररोज अत्याचाराचे ४२ गुन्हा दाखल होतात. २०१८ मध्ये २५.७ टक्के खटल्यांचा निवाडा करण्यात आला होता.