आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन आयडलच्या ऑडिशनच्या सेटवर सर्वच झाले हैराण, जेव्हा स्पर्धकाने केले नेहा कक्करला किस.....  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडल'चे 11 वे सीझन लवकरच सुरू होत आहे. यावेळी या शोमध्ये नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि अनु मलिकदेखील परीक्षण करणार आहेत. तर आदित्य नारायण या शोचे होस्टिंग करणार आहे. सध्या या शोसाठी ऑडिशन घेण्यास सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या शहरात जाऊन या ऑडिशन घेतल्या जात आहेत. अशात एक ठिकाणी ऑडिशन घेत असताना नेहासोबत ही घटना घडली. ऑडिशन दरम्यान अनेक गायक येऊन आपल्या गाण्याचे सादरीकरण करत होते. असाच एक युवक आला आणि  खूप सारे गिफ्ट्स होते. जे त्याने नेहाची आणले होते. त्याने नेहाला एक एक करून ते गिफ्ट्स द्यायला सुरुवात केली. नेहा ते सर्व पाहून खूप खुश झाली त्या आनंदात तिने त्याला आलिंगन दिले. परंतु त्या तरुणाने तेवढ्यातच नेहाला किस केले. यामुळे नेहाला तर धक्का बसलाच मात्र सर्व परीक्षकदेखील हे पाहून खूप हैराण झाले. चॅनलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहू शकता....