आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • A Couple Naked At The Peak Of The Great Pyramid Of Giza

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिरॅमिडवर न्यूड कपलचे लाजिरवाणे कृत्य कॅमेरात कैद, व्हिडिओ पाहताच लोकांनी सोडले टीकास्त्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इजिप्त : इजिप्तच्या गीझा द ग्रेट पिरॅमिड ऑफ खुफू याठिकाणी एक कपलने लाजिरवाणी गोष्ट केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पिरॅमिडवर साहस करणे या कपल चांगलेच महागात पडले आहे. डेन्मार्क येथील एका दाम्पत्याने पिरॅमिडवर चढाई करताना नग्न अवस्थेतील फोटो काढतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर दुसरीकडे या कपलने सार्वजनिक नैतिकतेचे उल्लंघन केल्याचे इजिप्त प्रशासनाने म्हटले आहे. 

 

तीन मिनिटाचा आहे हा व्हिडिओ
या कपलने जवळपास तीन मिनिटाचा एक व्हिडिओ यूट्यूबर टाकताच व्हायरल झाला आणि प्रशासनाने ताबडतोब याची नोंद घेतली. सीएनएनच्या रिपोर्टनुसार हा व्हिडिओ जवळपास तीन मिनीटाचा आहे. सोशल मीडियावर अपलोड करताच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे स्थानिक लोकांनी नाराजी व्यक्त केली असून डॅनिश कपलने केलेल्या या कृत्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

 

सार्वजनिक नैतिकतेचे उल्लंघन केल्याचा इजिप्त प्रशासनाचा आरोप 

व्हिडिओमध्ये दाम्पत्य पिरॅमिडवर चढाई करत असतानाचा शूट करण्यात आले आहे. वर पोहोचल्यानंतर महिला तिचे कपडे उतरवते. व्हिडिओमध्ये काहीवेळासाठी नग्न झालेले दृश्य आहे. इजिप्तच्या अॅण्टीव्हीटिस मंत्रालयाचे म्हणणे आहे की, या कपलने अश्लीलता पसरविण्याचे काम केले आहे. त्यांनी इजिप्तच्या सार्वजनिक नैतिकतेचे उल्लंघन केले आहे. सोबतच ऐतिहासिक वासरा लाभलेल्या पिरॅमिडवर चढणे देखील एक अपराध आहे. 

 

 

इजिप्तचे अॅण्टीव्हीटिस मंत्री खालिद अन अनानीने व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. इजिप्तच्या अहराम ऑनलाइनच्या मते, डॅनिश फोटोग्राफर अँडरियास ह्वीडने बुधवारी हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला आहे.