आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 वर्षांपासून लांडे दाम्पत्य करतेय विविध विषयांवर उखाण्यांतून समाज प्रबोधनाचे कार्य 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- गेल्या १९ वर्षांपासून वेगवेगळ्या विषयांवर उखाण्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य येथील सेवानिवृत्त अभियंता जल अभ्यासक श्रीकृष्ण लांडे व त्यांची अर्धांगिनी सुदेष्णा लांडे हे दाम्पत्य करीत आहे. यावर्षी या दाम्पत्याने आरोग्यदायी वनौषधी व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येवर आधारित एक, दोन नव्हे तर ५३ उखाणे तयार केले आहे.
 
भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सणांना महत्त्व आहे. प्रत्येक सणाला पाळावयाचे संकेत व करावयाची उपासना ही धार्मिक भावनेतून कधी आध्यात्मिकता तर कधी सामाजिक संबंधांना दृढ करण्यासाठी असते. कृषी संस्कृतीच्या विकासानंतर मानवाने सांस्कृतिक, सामाजिक विकास केला. सण, उत्सवात आनंद घेणे हे समाजाचे सांस्कृतिक अंग ठरले आहे. खरीप हंगामानंतर बोचऱ्या थंडीत प्रकृतीला पोषक असा आहार कुटुंबाने घ्यावा तसेच विवाह संस्थेतील पती-पत्नीच्या नात्याला शृंगारात्मक भावनिक स्वाद घालण्यासाठी स्त्रीने पतीचे नाव उखाण्यातून घेण्याची प्रथा अनादी कालापासून चालत आली आहे. 

 

विवाह प्रसंगी तसेच तीळ संक्रांतीला वाण देऊन उखाण्यातून पतीचे नाव घेण्याचा स्त्रीचा भाव विश्वाचा एक ठेवा मानल्या जातो. स्त्री सुलभतेची कोंडी उखाण्याची परंपरा सौभाग्यवती जपत आहे. येथील श्रीकृष्ण लांडे व त्यांच्या पत्नी यांनी गेल्या २० वर्षात सामाजिक प्रबोधनाकरिता स्वरचित उखाण्याची मदत घेत आहे. दरवर्षी नवनवीन विषयावर आधुनिक उखाणे रचित आहे. या उखाने पत्रक महिलांना सुदेष्णा लांडे दरवर्षी वितरीत करीत आहे. यंदा या दाम्पत्याने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निराकरणाकरीता व आरोग्यदायी वनौषधींच्या प्रचारावर आधारित ५३ उखाण्यांची रचना केली आहे. त्यात ज्येष्ठ नागरिक धोरण, त्यांचे व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, आरोग्य विषयक, संरक्षण, पेन्शन विषयक प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. लांडे हे गुळवेलचे मोफत वाटप करीत आहे. यातुन प्रेरणा घेऊन वनौषधींचा अभ्यास केला. त्याच्या जाती, फुले, फळे, मुळे इत्यादीचा सेवन विधी त्याची उपयुक्तता विषय उखाणे रचले आहे. लांडे दाम्पत्य हे वाण देतांना उखाण्यात पतीचे नाव घेण्यास प्रवृत्त करतात. १९९९ पासून ते दरवर्षी रचना करतात. याला संक्रांतीच्या सणात विशेष महत्त्व प्राप्त होते. विशेष म्हणजे यांनी केलेल्या रचना पुन्हा पुन्हा उल्लेखित होत नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...