आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • A Couple's Audi Car Stolen Twice Within Few Hours

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरी झालेली ऑडी कार पोलिसांनी शोधून काढली, पण चोरांनी पोलिस ठाण्यातूनही पुन्हा लंपास केली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लंडन : इंग्लंडमधील लुटरवर्थ येथे एक कार काही तासांतच दोन वेळेस चोरी झाल्याची घटनी घडली आहे. चोरट्यांनी एका घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत गाडीच्या चाव्या घेऊन गॅरेजमधून गाडी चोरली होती. दाम्प्यत्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी अवघ्या काही तासांतच एका हायवे वरून ही कार ताब्यात घेतली होती. कार ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गाडी मालकाला फोन करून याबाबतची माहिती दिली. पण चोरांनी काही वेळातच पोलिस ठाण्यातून पुन्हा एकदा कारची चोरी केली. त्यानंतर पोलिसांनी दाम्प्यत्याला फोन करून त्यांची माफी मागितली. ऑडी कंपनीची ही कार असून याची किंमत जवळपास 40 हजार पाउंड (अंदाजे 35 लाख रूपये) आहे. 


दाम्प्यत्याला वाटले पोलिस फिरकी घेत आहे. 
कारची पुन्हा चोरी झाल्याची सूचना देण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याने फोन केला असता पीडित दाम्प्यत्याने त्यांना विचारले की, तु्म्ही आमची खिल्ली तर उडवत नाही ना? यावर कर्मचाऱ्याने सांगितले की, नाही कार खरंच पुन्हा चोरीला गेली आहे आणि याबाबत त्यांची माफी मागितली. 

 

चोरांनी कारची पुन्हा चोरी करण्याचे षडयंत्र नियोजित केले होते. 
पोलिसांचे म्हणणे आहे की, चोरांनी कारची चोरी करण्याचे अगोदरपासूनच नियोजित केले होते. कारमधील पेट्रोल संपल्यामुळे त्यांनी कार हायवेवरच सोडली होती. चोरांना माहीत होते की, पोलिस कार ताब्यात घेण्यासाठी येतील आणि पेट्रोल भरून पोलिस ठाण्यात परत नेल्यावर तेथून पुन्हा एकदा चोरी करता येईल. पोलिस पुन्हा एकदा कारचा आणि चोरांचा कसून शोध घेत आहेत.