आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्चर्यकारक... गायीने दिला चार वासरांना जन्म, 11 कोटी प्रकरणात घडले अशी दुर्मिळ घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सेबेका : अमेरिकेतील मिनेसोटा येथे एका गाईने चार वासरांना जन्म दिला आहे. यामुळे त्या शेतकरी दाम्प्यात्याचा आनंद गगनात मावत नाहीये. एका गाईने चार वासरांना जन्म देणे आणि चारही वासरू सुखरूप असणे ही एक खूपच दुर्मिळ घटना आहे. 11 कोटी प्रकरणांमध्ये एकदा अशी घटना घडते. प्रसुतीच्यावेळी गाईची प्रकृती गंभीर होती. जोडप्याला वाटले की गायीच्या पोटात एकच वासरू आहे पण एका पाठोपाठ एक चार वासरांना जन्म दिल्यानंतर त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. 

 

कोट्यवधी प्रकरणातून एकदा घडते असे...

- 2018 मधील ही घटना आहे. मिनेसोटा राज्यातील सेबेका येथे राहणाऱ्या चक बेल्दो आणि देब बेल्दो यांच्या गाईने चार वासरांना जन्म दिला होता. यामुळे त्यांचे पूर्ण कुटुंब आनंदी झाले होते. 

- एका गायीने चार वारसांना जन्म देणे आणि चारही सुखरूप असणे हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. कारण 7 लाख प्रकरणांमध्ये एखादी गाय एकाचवेळी 4 वासरांना जन्म देत असते. तर चारही वासरांचा जीव वाचणे हे 11 कोटी प्रकरणांमध्ये एकदा घडते. त्यामुळे ही घटना आणखीनच दुर्मिळ होती. 

- जन्मलेल्या चार वासरांपैकी दोन मादा आणि दोन नर होते. वासरांना त्यांच्या जन्मानंतर दर चार तासाला बाटलीने दूध पाजण्यात येत होते. 

बातम्या आणखी आहेत...