आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेलापुरात पाच वर्षांच्या मुलाच्या हातात नाग देणाऱ्या सर्पमित्राविरोधात गुन्हा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - स्वयंघोषित सर्पमित्राने त्याच्या पाच वर्षांच्या मुलाच्या हातात दोन नाग दिले आणि त्याचे फोटो काढले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने बापाचा शोध घेतला. वन विभागाच्या पथकाने सातारा, माळशिरस तालुक्यात दिवसभर फिरून परशुराम शिंदे (२९, रा. लवंग, ता. माळशिरस) यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी माळशिरस वनपरीक्षेत्र कार्यालयाने केली.  
 

वनपरिक्षेत्र अधिकारी आय. एच. शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा लोणंद (ता. सातारा) येथील रहिवासी परशुराम शिंदे हा पंक्चर काढण्याचा व्यवसाय करतो. तसेच सर्पमित्र असल्याचे सांगत  साप पकडत फिरत असतो. त्याने पाच वर्षांच्या मुलाच्या हाती दोन विषारी नाग देऊन त्याचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. शिंदेंचा हा प्रकार वन विभागाचे सहायक प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांना दिसला. त्यांनी त्वरित शिंदेचे प्राेफाइल तपासून सातारा व माळशिरसच्या वन विभागास त्यावर कारवाईचे आदेश दिले. वन विभागाचे पथक लोणंदला पोहोचून चाैकशी केली असता तो लवंग गावी गेल्याची माहिती मिळाली. तेथे गेल्यावर तो अकलूजला जात असतानाच लवंग गावाच्या शिवारातच त्याला ताब्यात घेतले. वन्यजीव संरक्षक कायदा १९७२ अन्वये साप पकडून बालकाच्या हातात देणे, सोशल मीडियात फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वनरक्षक सचिन जोशी, वनपाल संतोष आगरकर, डी. बी. गवळी, संजय लडकत यांनी केली.स्वयंघोषित सर्पमित्राने त्याच्या पाच वर्षांच्या मुलाच्या हातात दोन नाग दिले आणि त्याचे फोटो काढले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने बापाचा शोध घेतला. वन विभागाच्या पथकाने सातारा, माळशिरस तालुक्यात दिवसभर फिरून परशुराम शिंदे (२९, रा. लवंग, ता. माळशिरस) यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी माळशिरस वनपरीक्षेत्र कार्यालयाने केली.
 
 
वनपरिक्षेत्र अधिकारी आय. एच. शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा लोणंद (ता. सातारा) येथील रहिवासी परशुराम शिंदे हा पंक्चर काढण्याचा व्यवसाय करतो. तसेच सर्पमित्र असल्याचे सांगत  साप पकडत फिरत असतो. त्याने पाच वर्षांच्या मुलाच्या हाती दोन विषारी नाग देऊन त्याचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. शिंदेंचा हा प्रकार वन विभागाचे सहायक प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांना दिसला. त्यांनी त्वरित शिंदेचे प्राेफाइल तपासून सातारा व माळशिरसच्या वन विभागास त्यावर कारवाईचे आदेश दिले. वन विभागाचे पथक लोणंदला पोहोचून चाैकशी केली असता तो लवंग गावी गेल्याची माहिती मिळाली. तेथे गेल्यावर तो अकलूजला जात असतानाच लवंग गावाच्या शिवारातच त्याला ताब्यात घेतले. वन्यजीव संरक्षक कायदा १९७२ अन्वये साप पकडून बालकाच्या हातात देणे, सोशल मीडियात फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वनरक्षक सचिन जोशी, वनपाल संतोष आगरकर, डी. बी. गवळी, संजय लडकत यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...