आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात आईसह मुलाला टोळक्याची जबर मारहाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव : घरासमोर फटाके फोडले म्हणून हटकल्यामुळे कुसंुब्यातील तरुणासह त्याच्या आईस काही मुलांनी मारहाण केली. त्यानंतर हा तरुण व त्याची आई एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले. तेथून मेडिकल मेमो घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचल्यानंतर मारहाण करणाऱ्या मुलांनी पाठलाग करून त्यांना रुग्णालयाच्या आवारात गाठून चॉपरने हल्ला केला. यात तरुणाच्या उजव्या हातावर दुखापत झाली. सुदैवाने त्याचे प्राण वाचले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली.

विजय दिलीप पाटील (वय २५) व त्याची आई कमलबाई (वय ४५) असे जखमी माय-लेकाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजता कुसंुबा गावात काही तरुणांनी पाटील यांच्या घराबाहेर फटाके फोडले. त्यामुळे कमलबाई यांनी या तरुणांना हटकले. याचा राग आल्यामुळे तरुणांनी थेट कमलबाई यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, याच वेळी विजय हादेखील घरी आला. त्याने तरुणांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यालाही मारहाण केली. गावकऱ्यांनी हा वाद मिटवल्यानंतर विजय व कमलबाई हे मारहाण करणाऱ्या तरुणांविरुद्ध तक्रार देण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आले. त्यांना तासभर बसवून ठेवल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी मेडिकल मेमो देऊन रुग्णालयात जाण्यास सांगितले. यावेळी मारहाण करणारे तरुणदेखील पोलिस ठाण्याच्या बाहेर थांबून होते. ते विजय व कमलबाई यांचा पाठलाग करीत थेट रुग्णालयात पोहोचले. उपचार घेण्याच्या आधीच त्यांनी रुग्णालयाच्या आवारात विजय याला गाठून थेट त्याच्यावर चॉपरने हल्ला चढवला. सुदैवाने रुग्णालयात उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षक, नागरिकांनी अडवल्यामुळे विजयचे प्राण वाचले. 


मारेकऱ्यांनी विजयवर चार-पाच वार केले. यात त्याचा डावा हात व पाठीवर दुखापत झाली आहे. तर कमलबाई यांच्या पोटावर लाथा मारून त्यांना जखमी केले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णालयात खळबळ उडाली. त्यानंतर मारहाण करणारे तरुण रुग्णालयातून पळून गेले. विजयच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...