आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशातील दमोह गावात शिक्षकांनी भिंतींचा केला फळा; मुलांसोबत प्रौढांनीही शिकावे यासाठी भिंतीवर लिहिली मुळाक्षरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 दमोह । मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील शिशपुरपटी गावातील प्रत्येक घराच्या भिंतींना शिक्षकांनी फळा केले आहे. येथील सरकारी शाळेच्या शिक्षकांनी गावातील घराच्या भिंतीवर हिंदी, इंग्रजीतील बाराखडी, वारांची नावे, सामान्यज्ञान व गणिताची सूत्रे लिहिली आहेत. गावाची लाेकसंख्या ७०० आहे. यापैकी ८० टक्के लोक निरक्षर आहेत. मुलांसोबत प्रौढांनाही शिक्षण घेता यावे, म्हणून प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी गावातील भिंतीवर अभ्यासच दिला आहे. त्याचबरोबर काही चित्रेही काढली आहेत. भिंतीवर सुस्पष्ट व आकर्षक रंगात हा अभ्यास रंगवला असल्याने लोकांना कायम स्मरणात राहील. प्राथमिक शाळेतील शिक्षक राजलक्ष्मी पाराशर, वंदना साहू व विनोद यादव यांनी यासाठी पुढाकार घेतला.  मुलांबरोबरच गावकऱ्यांनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, यासाठी हा प्रयत्न आहे. शिक्षिका राजलक्ष्मी म्हणाल्या, शाळेत मुलांना होमवर्क पुस्तकातून नव्हे तर गावातील भिंतीवर लिहिलेल्या मजकुरातून दिला जातो. त्यामुळे मुलांना अभ्यास सोपा जातो. 
बातम्या आणखी आहेत...