आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगारवाल्याने १२ लाखांत घेतले ३२ टन वजनी इंजिन, आता ते सेल्फी पॉइंट ठरले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिलवाडा - राजस्थानातील भिलवाडा येथे एका भंगारवाल्याने ३२ टन वजनाचे रेल्वे इंजिन १२ लाख रुपयांत विकत घेतले होते. त्याने टिळकनगर भागात नेऊन ठेवले. आता हेच इंजिन शहरातील नवे सेल्फी पॉइंट ठरले आहे. आता या परिसरातील मुले येथे खेळण्यास येतात. भंगारवाले अंबालाल खोईवाल यांनी विक्रम सिमेंटच्या कारखान्यातून विकत घेतले आहे. नीमचजवळ खोर येथील सिमेंट कारखान्यापासून रेल्वेस्थानकापर्यंत आदित्य बिर्ला ग्रुपची रेल्वेलाइन आहे. इंजिन स्टेशन - कारखान्यातून सामान वाहतूक करणाऱ्या रेल्वेचे होते. ते जुने झाल्याने कंपनीने त्याचा लिलाव केला. खोईवाल यांनी सांगितले, हे डिझेल इंजिन असून  ५० हजार टन वजन वाहून नेण्याची याची क्षमता आहे.
 

बातम्या आणखी आहेत...