आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • A Different Style Of Protest In Assam, Not Violence ... Opposition From Song music, Dance poetry!

आसामात आंदोलनाचा वेगळा चेहरा, हिंसाचार नव्हे...गीत-संगीत, नृत्य-कवितेतून विरोध!

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 दिवसांच्या हिंसाचारानंतर परिस्थिती सामान्य, रोज वेगवेगळ्या वर्गातील लोक सहभागी
  • शनिवारी राज्यात महिलांनी केला विरोध, इतर राज्यांसमोर अहिंसेचा आदर्श

​​​​​​गुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात संपूर्ण देशात हिंसक निदर्शने होत होती. त्याच वेळी आसामात आंदाेलनाचा चेहरा मात्र शांत दिसून आला. सुरुवातीच्या तीन दिवसांत भलेही हिंसक आंदोलने झाले हाेती, परंतु त्यानंतर आंदोलन पूर्णपणे अहिंसेच्या मार्गाने वाटचाल करू लागले आहे. ईशान्येतील लोक सत्याग्रह करू लागले आहेत. आसामी गमछा आंदोलनाचे प्रतीक बनला आहे. आंदोलन सर्वदूर पोहोचवण्यासाठी अखिल आसाम विद्यार्थी संघाने (आसू) वेगवेगळ्या वर्गातील समाजाला त्याच्याशी जोडले आहे. शनिवारी राज्यभरात आंदोलनाची जबाबदारी हजारो महिलांनी घेतली होती. त्यांनी ठिकठिकाणी धरणे धरले. गीत-भजन गात वादनही केले. लोकनृत्य करत कायद्यास विरोध केला. गुवाहाटीच्या तलाशील क्रीडा मैदानावर धरणे आंदोलन करणाऱ्या सत्तर वर्षीय गीता लष्कर म्हणाल्या, आमची हजारो मुले-मुली आंदोलन करत आहेत. त्यांना लाठ्या-काठ्या खाव्या लागत असताना आम्ही घरात कशा बसणार? शुक्रवारी राज्यभरात वकिलांनी निदर्शने केली. गुरुवारी राज्यभरात कलाकारांनी आपल्या विविध कलांच्या माध्यमातून विरोध दर्शवला. कवींनी कवितांचे वाचन केले. जुबिन गर्ग यांच्यासह सर्व गायकांनी गीत गायन केले. विविध वाद्यांचे वादनही करण्यात आले. याप्रसंगी आसाम प्रादेशिक चित्रपट क्षेत्रातील कलावंतांचीदेखील उपस्थिती होती. राज्यात १४ डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे. त्यानंतर हिंसक आंदोलन अहिंसेच्या दिशेने वाटचाल करत आहे. सामान्य लोक त्याच्याशी जोडले गेले. प्रत्येक वर्गातील लोक त्यात सामील आहेत. अासामची अभिनेत्री वर्षाराणी विषया म्हणाल्या, आसामी भाषाच शिल्लक राहणार नसेल तर आसामी चित्रपटांचे अस्तित्वही धोक्यात येईल. म्हणूनच आम्ही आपले काम करत या आंदोलनाला पुढे घेऊन जात आहोत. आसाम साहित्य सभेचे अध्यक्ष डॉ. परमानंद राजवंशी म्हणाले, आसाममध्ये आसामी भाषा राहिली नाही तर ती कोठे राहणार?त्यामुळेच आपण भाषेला वाचवण्यासाठी सत्याग्रह करत आहोत. कारण बांगलादेशातून आलेल्या लोकांमुळे आसामी भाषिक शिल्लक राहणार नाही. आसूचे सल्लागार डॉ. समुज्जले भट्टाचार्य म्हणाले, शांततामय मार्गाने आंदोलन करणे व विस्तार करण्यासाठी समाजातील सर्व वर्गांना जोडणे गरजेचे आहे. विद्यार्थी शिक्षणाबरोबरच आंदाेलनही करत आहेत. अशाच प्रकारे महिला कौटुंबिक जबाबदारी सांभाळून आंदोलनात सक्रिय झाल्या होत्या.

सरकार म्हणाले तरच जनमत चाचणी करू : संयुक्त राष्ट्र... 

- डुजॅरिक म्हणाले- परिस्थितीवर नजर, लोकांनी हिंसाचार करू नये

संयुक्त राष्ट्राने भारतात नागरिकत्व कायद्यावर जनमत चाचणीची मागणी फेटाळळी. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरसचे प्रवक्ते स्टीफन डुजॅरिक म्हणाले, राष्ट्रीय सरकारने विनंती केली तरच जनमत चाचणी घेण्याबाबत विचार होऊ शकतो. संयुक्त राष्ट्राची हीच पद्धत राहिली आहे. सरकार मागणी करत नाही तोपर्यंत जनमताचा कौल घेतला जात नाही. भारतातील परिस्थितीची निगराणी केली जात आहे. लोकांनी शांततेने निदर्शने केली पाहिजेत.

- केंद्र सरकारने नवा कायदा मागे घ्यावा : मायावती

केंद्र सरकारने नागरिकत्व कायदा तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी केली आहे. देशभरातून हिंसाचार वाढला आहे. आंदाेलन शांततेने सुरू आहे. एनआरसीबद्दल विराेधात स्वर उमटू लागले असतानाच देशभरात नव्या नागरिकत्व कायद्याच्याविराेधातही विराेधी आंदाेलन केले जात आहे. केंद्राने हट्ट साेडून द्यायला हवा, असे मायावतींनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

- कायद्याच्या समर्थनार्थ १ हजार १०० बुद्धिजीवी व विद्वान

देशाच्या विविध भागात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात हिंसक आंदोलन होत असतानाच एक मोठा वर्ग या कायद्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला आहे. देशभरात १ हजार १०० बुद्धिजीवी, विद्वान, संशोधकांनी या कायद्याचे समर्थन केले आहे. त्याचबरोबर पाठिंब्याचे वक्तव्यही जारी केले. धर्माधारे त्रस्त झालेल्या लाखो स्थलांतरितांची मागणी पूर्ण करणारा हा कायदा आहे. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून पीडित लोक भारतात आलेले आहेत.