आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर राडा, महिला पोलिसाला मारहाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गुरुवारी पहाटे रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ करणाऱ्या तरुणीने समजावून सांगण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद तरुणीला अटक केली असून, सोनल सुनिल सद्रे (३०,रा. सद्रेवाडा भराड गल्ली अहमदनगर) असे तिचे नाव आहे. तरुणीला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी महिला पोलिस कर्मचारी पूजा हरिदास सारसर यांनी फिर्याद दिली आहे. एक तरुणी ज्ञानेश्वर पादुका चौकात नशेत गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी गेले असता तिने सारसर यांना  शिवीगाळ करून मारहाण केली.