आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्ट्रासाऊंड पाहून घाबरली महिला, लगेचच पकडला नर्सचा हात, मुलाच्या फोटोकडे करू लागली इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंघम - ब्रिटनमधअये राहणारी रेबिका मेलिया प्रेग्नंट असल्याने आनंदात होती. पहिल्या बाळासाठी ते सर्व बारीक सारीक काळजी घेत होती. एक दिवस रेबिका रूटीन चेकअपसाठी डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी मुलाची अवस्था जाणून घेण्यासाठी सोनोग्राफी केली तेव्हा रेबिकाला स्क्रीन पाहून धक्काच बसला. स्क्रीनमध्ये बाळ एकटे दिसत नव्हते. त्याच्या शेजारी आणखी एक चेहरा दिसत होता. 


सोनोग्राफी पाहून घाबरली मेलिया
रेबिकाने लगेचच नर्सचात हात पकडला. आधी तर ती घाबरली पण नंतर तिने काळजीपूर्वक पाहिले तेव्हा तिला बाळासोबत कोणाचा चेहरा दिसतोय हे लक्षात आले. हा चेहरा मेलियाच्या आईसारखा होता. मेलियाने तिच्या बहिणींनाही याबाबत सांगितले. तेव्हा त्यांनाही ही इमेज पाहून धक्का बसला. मेलियाने सांगितले की, तिच्या आईचे निधन 6 महिन्यांपूर्वी झाले होते. 


आशिर्वाद द्यायला आली होती आई 
मेलियाने दावा केला की, सोनोग्राफीमध्ये तिच्या चेहऱ्याच्या जवळ तिच्या आईचा चेहरा दिसणे हा याचा पुरावा आहे की, आई तिला आशिर्वाद देण्यासाठी आली होती. मेलिया भावूक होत म्हणाली, मी प्रेग्नंट आहे हे सांगण्याआधीच माझी आई जग सोडून गेली होता. मी सहा महिन्यांची प्रेग्नंट असताना म्हणाले होते, की आज माझी आई हवी होती. त्यामुळे आईने ती आमच्यासोबत असल्याचे दाखवून दिले. तिने तर पोटातील तिचा नातूहू पाहिला.  


आपले आप्तेष्ठ आपल्या आसपासच असतात 
सोशल मीडियावर तिची कहाणी शेअर केल्यानंतर मेलिया म्हणाली. मी माझी कहाणी सर्वांना सांगत आहे. काही लोक यावर विश्वास ठेवणार नाहीत असेही होऊ शकते. पण मी दावा करू शकतो की, ज्यांच्यावर तुम्ही जीवनात जीवापाड प्रेम करता, ते मृत्यूनंतरही तुमच्याबरोबर राहतात. 

बातम्या आणखी आहेत...