आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅक्टर तरुणीला फेसबुक मित्राने घातला साडेअकरा लाखांचा गंडा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे  - पुण्यातील नामांकित रुबी हाॅल रुग्णालयात डाॅक्टर असलेल्या एका २७ वर्षीय तरुणीला फेसबुक मित्राने ११ लाख ५९ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना पुण्यात उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


डाॅक्टर तरुणी ही पुण्यात रुबी हाॅल येथे कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वी तिची फेसबुकवर एका तरुणाशी अाेळख झाली. संबंधित तरुणाने आपण परदेशात खासगी कंपनीत नोकरी करत असल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणीचा विश्वास संपादन करत त्याने तरुणीकडून वेगवेगळ्या कारणांसाठी ११ लाख ५९ हजार रुपये उकळले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.