आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅक्ट्री कामगाराच्या मुलाने उभा केला 497 अब्ज रूपयांचा व्यवसाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - श्रीमंती आणि गरीबी पाहून कोणत्याही व्यक्तीला त्याचे यश मिळत नाही. ज्या लोकांमध्ये काम आणि काहीतरी नवीन करून दाखवायची जिद्द असते अशा लोकांना यश मिळतच असते. यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच एका यशस्वी उद्योजकाची यशोगाथा सांगत आहोत. जे एका सामान्य फॅक्ट्री कामगाराचा मुलगा असून त्यांनी इंडोनेशियातील सर्वात मोठी स्टार्टअप कंपनी सुरू केली.

 

> विलियम यांनी मेहनतीच्या बळावर इंडोनेशियातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी पीटी टोकोपीडिया स्थापना केली. सध्या पीटी टोकोपीडिया इंडोनेशियातील सर्वात मोठे ऑनलाइन मार्केटप्लेस आहे. सॉफ्टबँकसहीत विद्यमान गुंतवणूकदारांनी पीटी टोकोपीडियामध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्यामुळे ही देशातील सर्वात मूल्यवान स्टार्टअप कंपनी बनली आहे. ही ई-कॉमर्स कंपनी इलेक्ट्रॉनिक्स, कपडे आणि हेल्थ केअर यांची विक्री करते. या व्यतिरिक्त ही कंपनी ट्रेन तिकीट खरेदी करण्यासाठी आणि मोबाइल फोन रिचार्ज करण्यासाठी वेबसाइट चालवते.


2025 पर्यंत 3,763 अब्ज रूपयांची कमाई करू शकते पीटी टोकोपीडिया
> एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये छापलेल्या बातमीनुसार, या ई-कॉमर्स कंपनीचा जवळपास 497 अब्ज रूपयांचा व्यवसाय आहे. एका रिसर्चच्या मते, स्टार्टअप कंपनीच्या दृष्टीने पीटी टोकोपीडिया इंडोनेशियातील सर्वाधिक कमाई करणारी कंपनी बनली आहे. पीटी टोकोपिडियाचे संस्थापक 37 वर्षीय विलियम तनुविजया एका सामान्य फॅक्ट्री कामगाराचा मुलगा आहे. विलियम यांनी कठोर परिश्रमाने पीटी टोकोपीडियाला इंडोनेशियातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी बनविले आहे.

 

> या कंपनीमुळे इंडोनेशियाचे लोक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी प्रेरित झाले आहेत. Google आणि टेमासेक होल्डिंग्ज पीटीईच्या अलीकडील अहवालानुसार, इंडोनेशियाची इंटरनेट अर्थव्यवस्था दक्षिणपूर्व आशियातील सर्वात मोठी आणि जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. यामुळे ई-कॉमर्स कंपनी पीटी टोकोपीडिया 2025 पर्यंत 3,763 अब्ज डॉलर्सपर्यंत कमाई करू शकते.

 

अधिक माहितीसाठी पुढील स्लाइडवर वाचा....

बातम्या आणखी आहेत...