आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Fan Called By Akshay Kumar In Mumbai By Spending His Money, When He Dies Akshay Cried Too Much

एका फॅनला अक्षय कुमारने स्वतः खर्च करून बोलावले होते मुंबईला, जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा खूप रडला होता 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सोमवारी 52 वा बर्थडे साजरा केलेल्या अक्षय कुमारचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांना तो आवडतो. काहींना तो त्याच्या जबरदस्त चित्रपटांमुळे आवडतो तर काहींना त्याच्या सामाजिक कार्यांसाठी किंवा त्याच्या फिटनेससाठी. अनेकदा तो त्याच्या फॅन्सची इच्छा पूर्ण करण्यासाठीही समोर येतो. त्याचा साच एक फॅन जयपुरमध्ये होता, ज्याच्या मृत्यूची बातमी कळल्यावर तो खूप रडला होता. हा किस्सा अन्नू कपूरने आपला एफएम शो 'सुहाना सफर विद अन्नू कपूर' मध्ये ऐकवला होता.  मस्क्युलर डिसट्रॉफी डिसीजने पीडित होता मुदित... 
अक्षयच्या या फांचे नाव होते मुदित, ज्याचा जन्म जयपुरच्या भाटिया कुटुंबामध्ये झाला होता. मुदितला मस्क्युलर डिसट्रॉफी डिसीज होता, या आजाराने पीडित असलेला व्यक्ती जास्तीत जास्त 18 वर्षेच जगू शकतो. हा मुलगा अक्षयचा खूप मोठा फॅन होता. 2008 मध्ये अक्षयचा एक चित्रपट पाहिल्यानंतर त्याने सुपरस्टारला भेटण्याचे ठरवले. पण मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याकारणाने पॅरेंट्ससमोर मोठी समस्या ही होती की, ते अक्षयपर्यंत कसे पोहोचतील. 6 वर्षे संघर्ष चालला आणि मग मेक अ विश नावाच्या संस्थेशी संपर्क साधला गेला, ज्याद्वारे मुदितची इच्छा अक्षयपर्यंत पोहोचली.  अक्षयने स्वतः पैसे खर्च करून मुंबईला बोलावले होते... 
जेव्हा ही गोष्ट अक्षय कुमारच्या कानावर पडली. तर त्याने मुदित आणि त्याच्या कुटुंबीयांचा सर्व खर्च करून त्यांना मुंबईला बोलावले. तिथे मुदितचा वाढदिवसाजरा केला गेला आणि सुपरस्टारने त्याच्यासोबत तीन तासांचा वेळ घालवला. मुलाचे बोलणे ऐकून अक्षय भारावून गेला आणि त्यानंतर जेव्हाही तो जयपुरला जायचा, तेव्हा त्या मुलाला भेटायला नक्कीच जायचा.  फोनवर मुदितची हिम्मत वाढवायचा अक्षय... 
2017 च्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये मुदितची तब्येत बिघडू लागली तेव्हा त्याच्या आईने अक्षयला ही गोष्ट कळवली. तेव्हा अक्षय अनेकदा मुदितशी फोनवर बोलायचा आणि त्याची हिम्मत वाढवायचा. त्याने मुदितला वचन दिले होते की, तो त्याचा चित्रपट 'जॉली एल.एलबी 2' च्या प्रमोशनसाठी जयपुर येत आहे तेव्हा त्याला नक्कीच भेटेल. हे ऐकून मुदित खूप खुश झाला होता. पण अक्षय जयपुरला पोहोचणार आणि त्याला भेटणार याआधीच त्याचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून अक्षय कुमार खूप रडला होता.