Home | News | a fan gives varun dhawan warning about natasha's murder

नताशाला मारण्याच्या धमकी प्रकरणावर वरुणने दिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'मी यावर जास्त काही बोलू शकत नाही' 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 11, 2019, 05:39 PM IST

17 एप्रिलला रिलीज होणार आहे वरूनच 'कलंक' सिनेमा...  

  • a fan gives varun dhawan warning about natasha's murder

    एंटरटेन्मेंट डेस्क : वरुण धवन सध्या 'कलंक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्याचा हा चित्रपट 17 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. याचदरम्यान असेही काही घडले आहे, ज्यामुळे वरुण धवन थोडा त्रस्त झालेला आहे. काही दिवसांपूर्वीच वरुणच्या एका महिला चाहतीने बळजबरी त्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता तिने वरुणची प्रेयसी नताशा दलालला जिवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणाबाबत वरुणला विचारले असता त्याने सांगितले की, 'दुर्दैवाने मी यासंदर्भात जास्त बोलू शकत नाही. कारण पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.' तथापि, तो लवकरच नताशासोबत लग्न करणार असल्याचे वरुणने स्पष्ट केले. तो म्हणाला, 'सध्या मी आपल्या चित्रपटांमध्ये खूप व्यग्र आहे. मात्र, मी लग्न करण्याचा निर्णय घेईल तेव्हा तुम्हाला अवश्य एका छायाचित्राद्वारे माहिती देईल.'

    'कलंक'नंतर वरुण 'स्ट्रीट डांसर'मध्ये दिसेल. याच वर्षी ८ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. यानंतर तो आपल्या होम प्रोडक्शनचा चित्रपट 'कुली नंबर १'ची पुनर्निर्मिती करणार आहे.

Trending