• Home
  • Gossip
  • a fan joined Indian Navy after seeing Vikky Kaushal's film 'Uri', Actor wishes him good luck

Bollywood / विकी कौशलचा चित्रपट 'उरी' पहिल्यानंतर फॅनने जॉईन केली इंडियन नेव्ही, अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा 

फॅनने मॅसेज करून विकीला दिली माहिती

दिव्य मराठी वेब

Jul 14,2019 06:17:06 PM IST

बॉलिवूड डेस्क : काही चित्रपट मनोरंजन करतात तर काही प्रेरणा बनतत्. विकी कौशलचा चित्रपट 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' देखील यापैकीच एक आहे. चित्रपटाने मनोरंजनासोबतच एका व्यक्तीला एवढे इंस्पायर केले की, त्याने 'उरी' पाहून इंडियन नेव्ही जॉईन केली.

फॅनने मॅसेज करून विकीला दिली माहिती...
विकीच्या फॅनने त्याला सोशल मीडियावर मॅसेज करून याची माहिती दिली. फॅनने आपल्या मेसेजमध्ये लिहिले, मी केरळच्या एजिमाला नेव्ही अकॅडमी लवकरच जॉईन करणार आहे. माझे ट्रेनिंग या महिन्याच्या 15 तारखेपासून (15 जुलाई) सुरु होणार आहे. जे 4 वर्षे चालेल. यानंतर मी इंडियन नेव्हीमधील एक ऑफिसर बनेल. तुमच्या चित्रपटाने मला नेव्ही जॉईन करण्यासाठी इंस्पायर केले आहे. मला जाणिवते आहे की, माझ्याप्रमाणेच अनेक लोकांना तुमच्या चित्रपटाने प्रेरित केले असेल. हा सुंदर चित्रपट बनवण्यासाठी धन्यवाद. हा नेहमीच माझे हृदय आणि मेंदूच्या जवळ राहील. मी ट्रेनिंगला जाण्यापूर्वी तुम्हाला हे सांगू इच्छित होतो की, तुमचा चित्रपट 'उरी' पहिल्यांनंतर मला नेव्ही जॉईन करण्याची प्रेरणा मिळाली.

विकीने व्यक्त केला आनंद...
विकीने आपल्या फॅनचे हे लेटर इंस्टाग्रामवर शेअर करून आनंद व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर त्याने हा मॅसेज चित्रपटाचे डायरेक्टर आदित्य धर यांनाही पाठवला. विकीने लिहिले, 'आमच्या प्रयत्नांना यश आले, माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत मित्रा, जय हिंद.'

X
COMMENT