आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पोलिस अधिकाऱ्याने कँसरग्रस्ताना विग बनवण्यासाठी आपले केस दान केले, सर्वांकडून होत आहे कौतुक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिसूर- केरळच्या त्रिसूर जिल्ह्यातील पोलिस अधिकारी अपर्णा लवकुमार यांनी कँसर ग्रस्ताना विग बनवण्यासाठी आपले केस दान केले. त्यांच्या या कार्यामुळे अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत. 
त्या म्हणाल्या की, "मी खूप मोठे काम केले नाहीये. माझे केस एक दोन वर्षात परत येतील. माझ्या नजरेत ते लोक खरे हिरो आहेत, जे गरजुंना आपले दान करतात. चेहऱ्यावर काय ठेवलंय, तुमचे मन साफ पाहीजे."अपर्णा यांनी यापूर्वीही अनेक वेळा मदत केली आहे
अपर्णा यांनी अनेकवेळा लोकांची मदत केली आहे. त्यांनी 10 वर्षांपूर्वी एका कुटुंबाला आपल्या बांगड्या दिल्या होत्या. एका कुटुंबातील मुलाचा मृत्यू झाला होता, आणि त्याला हॉस्पीटलमधून घरी नेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा अपर्ण यांनी आपला बांगड्या दान करुन त्यांना मदत केली होती.