कॅलिफोर्नियात बारमध्ये अज्ञाताकडून / कॅलिफोर्नियात बारमध्ये अज्ञाताकडून अंदाधुंद गोळीबार; 13 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था

Nov 09,2018 08:41:00 AM IST

कॅलिफोर्निया - अमेरिकेत दक्षिण कॅलिफोर्नियात भर गर्दी असलेल्या एका बारमध्ये बुधवारी रात्री एका अज्ञाताने अंदाधुंद गोळीबार केला. सुरक्षारक्षकांनी हल्लेखोराला ठार केले. त्याच्यासह एकूण १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. काउंटीतील शेरीफ यांच्या सर्जंटने ही माहिती दिली.


या गोळीबारात शेरीफ यांच्या एका उपअधिकाऱ्यालाही गोळी लागली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. थाउजंड ओक्समध्ये बार अँड ग्रील मध्ये रात्री ११ वाजून २० मिनिटांनी हा गोळीबार झाला. थाउजंड ओक्स लॉस एंजेलिसहून ४० मैल दूर आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका माणसाने बंदुकीने अनेक गोळ्या झाडल्या आणि नंतर धुराचा बॉम्ब फोडून पुन्हा गोळीबार सुरू केला. त्याने एकूण ३० गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी लॉस एंजेलिस टाइम्सला सांगितले.

X
COMMENT