आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टेनेसी : अमेरिकेतील एका फुटबॉल कोचला त्याने घेतलेला निर्णय चांगलाच महागात पडला आहे. कोचने काही वर्षांपूर्वी आपल्या दोन खेळाडूंना आपल्या घरी राहण्यासाठी बोलविले होते. मुलांच्या घरी आल्यानंतर कोचच्या पत्नीचे त्यातील एका सोबतच अफेयर सुरू झाले होते आणि तिने अनेकवेळा त्याच्यासोबत संबंध बनविले होते. याप्रकरणाबाबत कोर्टाने महिलेला तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तर महिलेने स्वतःवरील आरोप फेटाळत आम्हा दोघांत जे काही घडले ते संमतीने घडले असल्याचे तिने म्हटले आहे.
सिंगल मदरने कोचकडे पाठविले होते मुलांना
- हे प्रकरण 2014 सालचे आहे. टेनेसी येथील एका माध्यमिक शाळेत असिस्टंट फुटबॉल कोच असणाऱ्या जस्टिन मॅक्कार्टरची पत्नी केल्सी मॅक्कार्ट (27) ला आपल्या घरी राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलासोबत प्रेम झाले होते. हा मुलगा जस्टिनचाच विद्यार्थी होता आणि त्याच्याकडून फुटबॉलचे प्रशिक्षण घेत होता.
- अल्पवयीन मुलगा आपल्या मोठ्या भावासोबत फुटबॉल कोचच्या घरी राहत होता. दोघेही सिंगल मदरचे संतान होते आणि घरच्या परिस्थितीमुळे त्यांच्या आईने त्यांनी जुलै 2014 मध्ये आपल्या कोचच्या घरी राहण्याची परवानगी दिली होती.
- दोघेही कोचच्या घरी राहत असताना छोटा भाऊ आणि कोचची पत्नी केल्सी एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्यात एक नाते तयार झाले. पण नंतर मुलाने महिलेवर स्वतःचे शोषण केल्याचा आरोप लावला.
मुलाने व्हायरल केला होता महिलेचा न्यूड फोटो
- ऑगस्ट 2015 मध्ये दोन्ही मुलांनी आपल्या कोचचे घर सोडले होते. पण ऑक्टोबर 2015 मध्ये केल्सीने आपल्या पतीला लाडीगोडी लावत अल्पवयीन मुलाला आपल्या घेऊन येण्यासाठी तयार केले.
- यानंतर काही दिवसांनी मुलाने केल्साचा एक न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यामुळे त्यांच्यात संबंध असल्याचे सर्वांसमोर उघड झाले. यानंतर बाल संरक्षण सेवा आणि पोलिसांनी तपासणी करण्यास सुरूवात केली.
- हे प्रकरण उघड झाल्यानंतर जस्टिनला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. सर्वप्रथम महिलेसोबत आपले संबंध असल्याचा मुलाने विरोध केला. पण फोटो दाखवल्यानंतर त्याने महिलेवर यौन शोषण केल्याचा आरोप केला. नेहमीच यौण शोषण झाल्यामुळे मला अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
- मुलाने केलेल्या आरोपांनंतर अल्पवयीन मुलाचा बलात्कार आणि त्याचे शोषण केल्याप्रकरणी केल्सीला अटक करण्यात आली. कोर्टाने याबाबत महिलेला तीन वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.