आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Gang Of 4 Persons Opened Fire On Police Team Near Akshardham Temple In New Delhi

अक्षरधाम मंदिराजवळ पोलिसांवर 4 जणांच्या टोळक्याने केली फायरिंग, सुदैवाने जीवितहानी नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीमधील अक्षरधाम मंदिरात आज(रविवार)सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी पोलिसांच्या एका टीमवर अंदाधुंद फायरिंग केली. पोलिसांनी थांबवण्याच्या प्रयत्न केल्यावर, चार चाकी गाडीतून पळ काढला.
पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोर चार चाकी गाडीतून आले होते. त्यानंतर अचानक पोलिसांच्या टीमवर फायरिंग करुन त्यांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच, परत त्यांच्यावर फायरिंग करुन हल्लेखोर पसार झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. प्राथमिक तपासात हा दहशतवादी हल्ला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण, हल्ला कशामुळे झाला, हल्लेखोर कोण होते, याचा शोध अद्याप लागला नाहीये. पुढील तपास दिल्ली पोलिस करत आहेत.