आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Girl Came From Denmark And Got Married With The Punjabi Boy, Now Helping Him To Rehabilitate

आदर्श : इंटरनेटवर प्रेम झाले आणि डेन्मार्कहून भारतात आली प्रेमवेडी, पतीला व्यसनमुक्त करण्यासाठी घेतला पुढाकार, पतीसोबत राहते व्यसनमुक्ती केंद्रात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरदासपुरचा मलकीयत पत्नी मारियासह - Divya Marathi
गुरदासपुरचा मलकीयत पत्नी मारियासह

गुरदासपूर - 'प्यार दीवाना होता है-मस्ताना होता है, हर खुशी से-हर गम से बेगाना होता है...' या गाण्याचे बोल गुरदासपूर जिल्ह्यातील मलकीयतच्या आयुष्याला लागू पडतात. मलकीयतने व्यसनच आपल्यासाठी सर्वकाही असे मानले होते. पण एका मुलीने त्याचे आयुष्य बदलून टाकले. मारिया असे या मुलीचे नाव असून ती डेन्मार्क येथील रहिवासी आहे. दोघांची इंटरनेटवर ओळख झाली होती. ओळखीनंतर आपल्या मित्राला जीवनसाथी बनवण्यासाठी मारिया डेन्मार्कहून भारतात आली. पण मलकीयत व्यसनाच्या आहारी गेला आहे हे जाणून देखील तिने हार मानली नाही. आपल्या पतीला व्यसनापासून दूर करण्यासाठी तिने आपल्या पद्धतीने प्रोत्साहन दिले. एवढेच नाही तर ती मलकीयतसोबत नशामुक्ती केंद्रात देखील थांबली होती. 

 

घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे मलकीयत व्यसनाच्या दलदलीत फसत गेला
गुरदासपूर जिल्ह्यातील संदल गावातील रहिवासी असलेल्या मलकीयतने सांगितले की, तो दारूच्या आहारी गेला होता. दारू सोडण्यासाठी तो डॉक्टरांकडे गेला असता डॉक्टरांनी त्याला एलप्रेक्सच्या गोळ्या खाण्यासाठी दिल्या. पण त्याला गोळ्यांचेही व्यसन लागले आणि तो गोळ्यांचे पूर्ण पाकिटच खाऊ लागला. इतक्यावरच न थांबता त्याने फ्लूडचे व्यसन करण्यास सुरुवात केली. घरची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे त्याला पैशाची कमी नव्हती. यामुळे तो व्यसनाच्या दलदलीत आणखीनच फसत गेला. यादरम्यान 1 जानेवरी 2019 रोजी इटेलियन चॅट प्लॅटफार्मवर डेन्मार्कच्या मारियासोबत त्याची मैत्री झाली. 22 दिवसांनंतर 23 जानेवारी रोजी मारिया मलकीयतला भेटण्यासाठी भारतात आली. येथे येऊन 15 फेब्रुवारी रोजी दोघांनी विवाह केला. लग्नानंतर मलकीयतला घरातून जास्त पैसे मिळत असल्याने त्याने हेरॉइनचे व्यसन करण्यास सुरुवात केली. असे असले तरी त्याने आपल्या पत्नीला भारतात येण्यापूर्वी तो व्यसनाच्या आहारी गेल्याचे सांगितले होते. यानंतर पत्नीने त्याला व्यसन न करण्यासाठी प्रेरित करणे सुरु केले. 


व्यसनमुक्तीसाठी पत्नीने घेतला पुढाकार

मलकीयतने सांगितले की, 12 मार्च रोजी मारियाचा विसा संपल्यानंतर तो तिच्यासोबत डेन्मार्कला गेला. व्यसनामुळे तेथे त्याची प्रकृती बिघडली. त्यावेळी त्याच्या पत्नीने त्याचा आधार बनत त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली. बरेच दिवस उपचार केल्यानंतर फरक न पडल्यामुळे दोघेही 7 मे रोजी भारतात परतले. यादरम्यान तो सतत व्यसन करत होता. पत्नीच्या म्हणण्यानुसार व्यसन सोडण्याचा निश्यच केलेला मलकीयतच नाही तर त्याची पत्नी मारिया देखील नशामुक्ति केंद्रात त्याची साथ देत आहे. य

 

पतीसोबत इतरांनाही करत आहे प्रेरित
याबाबत नशामुक्ती केंद्राचे संचालक रोमेश महाजन यांनी सांगितले की, मारिया फक्त आपल्या पतीलाच नाही तर येथील इतर रुग्णांना देखील व्यसन न करण्यासाठी प्रेरित करत आहे. दोघांमधील प्रेम इतरांसाठी एक मोठा आदर्श आहे.