आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटदुखीमुळे परेशान असायची स्कूल गर्ल, अपेंडिक्स समजून करत होती इग्नोर, पण एका रात्री अचानक ओली झाली ट्राउजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डबलिन : आयर्लंडमध्ये राहणारी एक टीनेजर मुलगी 26 आठवड्यांच्या प्रेग्नन्सीनंतर एका रात्री अचानक आई झाली. तिने किचनच्या फरशीवर मुलीला जन्म दिला. हैराण करणारी गोष्ट ही आहे की, तिच्या प्रेगनन्सीबद्दल या स्कूल गर्लला काहीच माहित नव्हते. तिला वाटत होते तिला अपेंडिक्स झाला होता, त्यामुळे तिचे पोट थोडेसे फुगले आहे. बाळाची लाथ मारणे तिला गॅस झाल्यासारखे वाटायचे. मुलगी वेळेआधी झाली आणि ती हाताच्या तळव्याएवढी आहे. 

ट्राउजरमधून घसरत बाहेर आली मुलगी...  
- ही गोष्ट डबलिनमध्ये राहणाऱ्या 18 वर्षांच्या मिलाइसची आहे, जिने 26 आठवड्यांच्या प्रेग्नन्सीनंतर एका मुलीला जन्म दिला आहे. मुलीची डिलीवरी अर्ध्या रात्री अचानक झाली, जेव्हा ती आपल्या किचनमध्ये होती. 
- मिलाइसचे म्हणणे आहे की, डिलीवरी इतकी अचानक झाली की, तिला कळले सुद्धा नाही आणि मुलगी तिच्या ट्राउजरमधून घसरत घसरत खाली पडली. तिने किचनच्या फरशीवर जन्म घेतला. 
- मुलगी खूप कमजोर होती आणि तिचे वजन फक्त 450 ग्राम होते. आकारात ती आपल्या आईच्या तळहाताएवढी होती. जन्मल्यानांतर लगेच ती थोडे रडली बाबी मग तिचे श्वास बंद झाले. त्यांनतर टीनेजरच्या आईने लगेच एंबुलेंसला बोलावले. 
- मिलाइसनुसार, थोड्याच वेळात एंबुलेंसवाले आले त्यांनी मुलीला प्लास्टिक बॅगमध्ये ठेवायला सांगितले. हे ऐकून टीनेजर आई थोडी घाबरली. मात्र नंतर एंबुलेंसवाल्यांनी त्यांना सांगितले की, ते मुलीला गरम ठेवण्यासाठी तसे सांगत आहेत. 

तीन महिने हॉस्पिटलमध्ये होती मुलगी... 
- 'या घटनेमुळे मी एवढी हादरले होते की, दुसऱ्यादिवशी सकाळपर्यंत मला खरेच वाटतं नव्हते की, मी आई झाले आहे. नंतर जेव्हा मी तिला पहिले तेव्हा माझ्यातले मातृत्व जागृत झाले आणि मी लगेच तिच्या पित्याला फोन लावला. आम्ही मुलीचे नाव हार्पर ठेवले आहे.'
- मुलगी वेळेआधी म्हणजे 6 महिन्यांअगोदरच जन्मली होती. त्यामुळे ती खूप कमजोर असल्यामुळे पुढचे तीन महिने तिला हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल. यादरम्यान तिच्या डोळ्यांच्या दोन लेजर सर्जरीदेखील झाल्या आहेत. 
- अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी मिलाइस पुढील काही वर्षात पुन्हा शाळेत जाणार आहे. मात्र सध्या ती आपल्या मुलीकडे लक्ष देत आहे. मुलीचे वजन आता 3.6 किलो एवढे झाले आहे. ज्यामुळे ती खूप खुश आहे. 

बातम्या आणखी आहेत...