आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नराधमांनी शालेय विद्यार्थिनीचे दिवसाढवळ्या केले अपहरण, जंगलात नेऊन केला सामुहिक बलात्कार; पोलिसांनी चार तासांत आरोपींना ठोकल्या बेड्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैतारण/पाली -  येथे एका अल्पवयीन मुलीचे दिवसाढवळ्या अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याचा प्रकार समोर आला आहे. पीडिता शनिवारी मोबाइल दुरुस्त करण्यासाठी मार्केटमध्ये आली होती. दरम्यान आरोपींनी तिचे दुचाकीवरून अपहरण करून तिच्यावर जंगलात सामुहिक अत्याचार केला. आरोपींच्या तावडीतून सुटल्यानंतर पीडिता घरी जाऊन गुमसुम झाली. रात्री वडिलांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर रविवारी आरोपींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. याबाबत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी सुरु आहे. 


पोलिसांननुसार दहावी पास झालेली एक मुलगी शनिवारी दुपारी आपल्या बहिणीचा बिघडलेला मोबाइल दुरुस्त करण्यासाठी एका दुकानावर आली होती. घरी परतत असताना गाडीवर आलेल्या तिघांनी तालकिया चौकात तिच्यासमोर गाडी उभी करून तिला थांबवले. यानंतर आरोपींनी बळजबरीने तिला गाडीवर बसवून बांझाकुडी रोडजवळील जंगलात नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. नंतर आरोपीली युवतीला तिथेच सोडून निघून गेले होते.  

 

पीडिताने घरी गेल्यानंतर दिवसभरात घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही सांगितले नाही. रात्री तिची अवस्था पाहून वडिलांनी विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितले. रविवारी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एसपी आनंद शर्मांनी याप्रकरणात तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले. जैतारण डीएसपी सुरेश कुमार यांनी सांगितले की, ठाणे अध्यक्ष  रविंद्रसिंह खींची यांच्या चमुने 4 तासांत आरोपींनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी कुंदन ऊर्फ लादे (19) कमलेश (19) दोघांना अटक केली आहे. सोबत एक अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.