पैशापुढे प्रेम झाले पराभूत : तिने १० हजार डॉलर्ससाठी बाॅयफ्रेंडला साेडले

दिव्य मराठी

Apr 26,2019 11:30:00 AM IST

लंडन - लंडनमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने १० हजार डॉलर्स म्हणजे सुमारे ६ लाख ७ हजार रुपयांसाठी तिच्या पाच वर्षांपासूनच्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप केले. विशेष म्हणजे, याबद्दल तिला कसलेही दु:ख नाही. मलाच त्याच्या यातनामय नात्यापासून मुक्ती हवी हाेती. त्यामुळे पैसे घेऊन मी काहीही चुकीचे केलेले नाही, अशी प्रतिक्रियाही तिने व्यक्त केली आहे.


स्वत:चे नाव जाहीर न करणाऱ्या संबंधित तरुणीने एका सोशल साइटवर ही खुलासा केला आहे. त्यात माझ्या बाॅयफ्रेंडच्या पालकांनी माझ्यासाेबत ही डील केली. अर्थात, यामुळे माझा फायदाच झाला. कारण मी स्वत:च त्याला साेडणार हाेते. यावर सोशल मीडिया युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त हाेत आहेत; परंतु या तरुणीकडे तिचा निर्णय याेग्य सिद्ध करण्याचे चांगले युक्तिवाद आहेत, मात्र खरे.

त्याच्या कुटंुबीयांनी माझा वेळाेवेळी अपमान केला; ही रक्कम त्याची भरपाई

संबंधित तरुणी तिच्या पार्टनरसाेबत महाविद्यालयीन शिक्षण घेत हाेती तेव्हापासून डेट करत हाेती. त्याचे आई-वडील या नात्याने आनंदी नसल्याने तिला माहीत हाेते. तरुणीने सांगितले की, साखरपुडा झाल्यानंतर ताे माझ्यावर त्याच्या आई-वडिलांसारखा हुकूम गाजवू लागला हाेता. मी काेठे जाते, काय करते, कुणाशी बाेलते आदी चाैकशी करू लागला. लग्नानंतर मी तुझ्यासाठी शेड्यूल बनवेन; जेणेकरून तू माझ्या मर्जीने वागू शकशील. आपल्या नात्यात मीच जास्त सांभाळून घेताे व तुझ्याशिवाय मी अधिक चांगल्या प्रकारे जीवन जगू शकताे, असे त्याने मला सांगून टाकले. तसेच ताे खूप दारू पित असल्याचेही मला त्या वेळी कळले. ते पाहून मी सतर्क झाले व बस आता खूप झाले, असा विचार करून ब्रेकअपचा निर्णय घेतला. काही काळानंतर त्याच्या आईने मला ब्रेकअपसाठी १० हजार डॉलर्सची ऑफर दिली व ती मी स्वीकारली. त्यानंतर मी ही बाब काेणालाही सांगणार नाही, या अटीवर आम्ही एक करार केला. त्यामुळे पैसे घेतल्यानंतर मी त्याच्याशी संबंध ताेडले व थेट माझा सामान पॅक करून माझ्या घरी परतले. तेव्हापासून मी त्याचे ताेंडही पाहिले नाही. त्याने मला अनेकदा फाेन केला; परंतु मी त्यास काेणताही प्रतिसाद दिला नाही. या ब्रेकअपबद्दल त्याच्या पालकांनी माझे आभारही मानले हाेते. त्याच्या कुटुंबीयांनी माझा अनेकदा अपमान केला हाेता. हे पैसे त्याची नुकसानभरपाई आहेत, असेही तिने म्हटले आहे.

X