आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिकच्या थैलीत सापडलेल्या मुलीचे नामकरण केले ‘इंडिया’; आईच्या शोधासाठी जारी व्हिडिओ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 वॉशिंग्टन - अमेरिकेतील जॉर्जियाच्या जंगलात पोलिसांना एक प्लास्टिकच्या थैलीत एक नवजात मुलगी सापडली. पोलिसांनी तिला रुग्णालयात भरती केले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले, मुलीचे नाव “इंडिया’ ठेवले आहे. ती एकदम स्वस्थ आहे. तिच्या आईच्या शोधासाठी एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. त्यावर लिहिले  आहे, या भागात राहणाऱ्या गरोदर महिलेबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना कळवावे. यानंतर लोकांनी हॅशटॅग # बेबीइंडिया नावाने एक मोहिम सुरू केली आहे. मुलीच्या आईचा शोध सुरू केला आहे. तर मुलीला दत्तक घेण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. तिला पाहूनही जात आहेत.   एका महिलेने सांगितले, माझ्यासह हजारो लोकांनी फोरसिथ काऊंटी ऑफिसला संपर्क साधून बेबी इंडियाला दत्तक घेण्यासाठी माहिती मिळवली आहे.  

 

शहरातील शेकडो लोकांची मुलीस दत्तक घेण्याची तयारी

पोलिसांच्या शरीरावर असलेल्या कॅमेऱ्यातून रेकॉर्ड झालेला हा व्हीडिओ मंगळवारी जारी करण्यात आला. यात जॉर्जिया येथील कमिंग्जमध्ये शेरिफच्या अधिकाऱ्यांना या मुलीस थैलीतून सुरक्षित बाहेर काढताना दाखवले आहे. यानंतर पोलिस अधिकारी मुलीस वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देतात. ते तिच्यावर प्रथमोपचार करून एका कांबळीत गुंडाळून ठेवतात.