आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विघ्नहर्ता गणेशाला भेटायला चीनहून भारतामध्ये आली बॅले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : टीव्ही मालिका "विघ्नहर्ता गणेश'ची लोकप्रियता आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली आहे. नुकतीच या मालिकेच्या सेटवर चीनवरून आलेली चाहती बॅले ली हिने भगवान गणेश ऊर्फ निष्कर्ष दीक्षितची भेट घेतली. बॅले ही चीनमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तिने चीनमध्ये युवा कोट्यधीशांच्या यादीत आपली जागा बनवली आहे.
असे ऐकण्यात आले की, बॅले इन्स्टाग्रामवरून निष्कर्षपर्यंत पोहोचली होती आणि तिला याचे उत्तर मिळाले तेव्हा तिला खूप आनंद झाला होता. तिने भेटण्याची वेळ मागितली आणि निष्कर्षने तिला मुंबईला बोलावून घेतले. बॅलेने होकार दिला आणि भेटवस्तुंनी भरलेल्या बॅगेसोबत भारत दौरा केला. केवळ बॅलेच नाही तर तिच्या मित्रांनीही निष्कर्षसाठी भेटवस्तू पाठवल्या आहेत.
निष्कर्ष म्हणतो, "चीनमध्येही लोक विग्नहर्ता गणेश पाहतात, हे ऐकून मला आश्चर्य वाटले. चीनमधील लोकही माझा अभिनय पसंत करतात, हे ऐकून मला खूप आनंद झाला आहे. बॅले सुंदर मुलगी आहे. तिने दिलेल्या सर्व भेटवस्तू खास आहेत. तिने सर्व कलावंतांसाठी गणेश थीमवरील भेटवस्तू आणल्या आहेत. मीदेखील तिला मुंबई दाखवली. माझी भविष्यामध्ये तिची भेट घेण्याची इच्छा आहे.'
 

बातम्या आणखी आहेत...