आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका निर्जन ठिकाणी मुलीला दिसली फॅक्ट्री, प्रवेश निषेधचा दिला होता इशारा ; पण तरीही गेली आत आणि........

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खिमकी - रशियामध्ये  एक मुलगीने अज्ञात ठिकाणी एक अशी जागा शोधून काढली जिथे तिने जायला नको होते. या मुलीने केलेल्या या गोष्टीमुळे खुद्द सुरक्षा मंत्रालयाने तिला चेतावणी दिली आहे. लाना सेटोर नामक ही मुलगी अॅडव्हेंचर टूर करण्यासाठी खिमकी शहरात गेली होती. येथील एका निर्जाजनगेवर फिरत असताना तिला एक फॅक्ट्री दिसली. लानाच्या मते नकाशावर अशी कोणतीच फॅक्ट्री दिसत नव्हती त्यामुळे त्या फॅक्ट्रीबद्दल जाणून घेण्यासाठी तिने फॅक्ट्रीत जाण्याचा निर्णय घेतला. फॅक्ट्रीच्या परिसरात प्रवेश निषेधचे बोर्ड लावले होते पण लानाने त्याकडे दुर्लक्ष करत एका भुयारामार्फत फॅक्ट्रीत प्रवेश केला. 


तेथे कोणतीच सुरक्षा नव्हती
> लानाने सांगितले की, ती फॅक्ट्रीमध्ये पोहोचल्यानंतर तिथे तिला भीमकाय मशीन्स दिसल्या. पण तेथे त्या मशीन किंवा फॅक्ट्रीच्या सुरक्षा आणि देखरेखीसाठी सुरक्षा रक्षक नव्हता. लानाने तिच्या टीमसोबत तेथील काही छायाचित्रे घेतली.

 

जसे काही एखादे संपूर्ण शहर तेथे वसवले होते

> लीना तिच्या टीमसोबत एका मार्गाने फॅक्ट्रीच्या सर्वांत उंच भागावर गेली होती. तेथील दृश्य आश्चर्यचकित करणारे होते. कारण त्याठिकाणाहून पाहिल्यानंतर फॅक्ट्री एखाद्या शहराएवढी पसरलेली होती. 

 

आत होत्या विचित्र मशीन्स

> यानंतर एका मोठ्या इमारतीमधील विचित्र मशीन्सवर टीमची नजर गेली. या फॅक्ट्रीमध्ये काय काम होत असेल याचा त्यांना लवकरच अंदाज आला. त्यांना समजले की तिथे, रॉकेट आणि रशियन लष्कराच्या शस्त्रांचे पार्ट्स तयार होतात. हे समजतात लाना आणि त्यांच्या टीमने परत जाण्याचा निर्णय घेतला आणि सकाळ होण्याच्या आत त्यांची टीम तेथून बाहेर पडली. 


अडचणीत सापडली लाना

> लानाने आपल्या या वेगळ्या शोधाविषयी सोशल मिडीयावर सांगितले. तिने नकळतपणे या गुप्त जागेचे फोटो अपलोड केले. फोटो व्हायरल झाल्यानंतर रशियन सरकारच्या सायबर विभागाचे त्यावर लक्ष गेले. याबाबत सुरक्षा मंत्रालयला माहिती मिळताच गोंधळ उडाला. काही दिवसांनंतर लानाच्या घरी अशाप्रकारची चूक परत केल्यास परिणाम वाईट होतील अशी नोटीस आली. ही नोटीस खुद्द रशियाचे रक्षा मंत्री दिमित्री रोगाजिन यांच्या नावाने आली होती.  

 

फॅक्ट्रीचे आणखी फोटोज पाहण्यासाठी पुढील स्लाइड्वर क्लिक करा.....

 

बातम्या आणखी आहेत...