आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • A Guy Get Arrested In The Case Of 15 year old Girl Kissing In The Street

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंधरा वर्षीय मुलीचे रस्त्यात चुंबन घेणारा तरुण गजाआड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शाळेत जाणाऱ्या एका पंधरा वर्षीय मुलीला रस्त्यात अडवून तिचा प्रथम हात पकडला, या प्रकारामुळे युवती घाबरली व पुढे चालत होती. त्यावेळी युवकाने पुन्हा तिचा पाठलाग करून भररत्यात मुलीचे चंुबन घेतले, हा धक्कादायक प्रकार गुरूवारी (दि. ३) घडला. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शेख साजिद शेख फारुख (२६ रा. सैय्यदपुरा, नांदगाव पेठ) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एक पंधरा वर्षीय मुलगी शाळेत जाण्यासाठी गुरूवारी सकाळी पायदळ जात होती. त्यावेळी शेख साजिदने मुलीचा हात पकडला. तीने घाबरून हाताला झटका मारून हात सोडवून घेतला आणि पुढे जायला लागली. त्यावेळी पुन्हा साजिदने मुलीच्या मागे जाऊन भररस्त्यात तिच्या गालाचे चुंबन घेतले. हा प्रकार झाल्यामुळे ही मुलगी चांगलीच घाबरली. तिने घडलेला प्रकार तीच्या आईला आणि वर्गशिक्षिकेला सांगितला. त्यामुळे मुलीने गुरूवारी उशिरा रात्री नांदगाव पेठ पोलिसात जाऊन तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी शेख साजिदविरुद्ध गुन्हा दाखल केला.