आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Gym User Has Filed A Complaint Of Cheating Against Hrithik Roshan, Because Of Not Fulfill The Promise

ऋतिक रोशनवर फसवणुकीची तक्रार दाखल, जिम यूजरने केला वचन पूर्ण न केल्याचा आरोप 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आगामी चित्रपट 'सुपर 30' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या ऋतिक रोशनविरुद्ध सायबराबाद (हैदराबाद) मध्ये फसवणुक केल्याची तक्रार दाखल झाली आहे. आय. शशिकांत नावाच्या एका जिम यूजरने एक जिम कंपनी आणि त्याचा ब्रँड अँबेसेडर असलेल्या ऋतिकवर आरोप केला आहे की, तो वजन कमी करणे आणि डेली वर्कआउट सेशन करून घेण्याचे आपले वचन पाळण्यात अयशस्वी राहील आहे. ही तक्रार इंडियन पॅनल कोडच्या सेक्शन 406 आणि 420 अन्वये दाखल करण्यात अली आहे.  

 

तक्रारपत्रकात लिहिले आहे... 
रिपोर्ट्सनुसार, तक्रारपत्रकारत लिहिले गेले आहे की, 'कुकात्पल्लीच्या शेषाद्रीनगरचा निवासी आय. शशिकांतने सायबराबादच्या केपीबीएच पोलीस स्टेशनमध्ये 22 जूनला तक्रार दाखल केली होती की, त्याने डिसेंबर 2018 मध्ये क्युअर फिट जिममध्ये डिस्काउंट रेटमध्ये 17490 रुपयांना एका वर्षाची मेंबरशिप घेतली होती. सप्टेंबर 2018 मध्ये सुरु झालेल्या या कंपनीने आपल्या जाहिरातींमध्ये असा दावा केला होता की, ते अमर्यादित तासांचे वर्कआउट क्लास आणि वेट लॉस ट्रीटमेंट देतील. पण त्यांनी प्रॉपर वर्कआउट सेशन नाही दिले.'  

 

जिममध्ये आहेत मर्यादेपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन... 
तक्रारीत शशिकांतने हा आरोपदेखील केला आहे की, जिममध्ये एकूण 1800 लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. पण तिथे वर्कआउट सेशन देण्यासाठी आवश्यक तेवढा कार्पेट एरियादेखील नाहीये. याव्यतिरिक्त तीन दिवसांपर्यंत स्ट्रेच वर्कआउट सेशन उपलब्ध नाहीये, ज्यामुळे हेल्थला फायदा होऊन शकत नाहीये.  कुकात्पल्लीच्या लोकांसोबत गैव्यवहार करण्याबरोबरच जिम सेंटर मानसिक तणावदेखील देत आहे. 

 

हे आहे पोलिसांचे म्हणणे... 
केपीएचबीच्या इंस्पेक्टर के. लक्ष्मी नारायणने एका बातचितीमध्ये सांगितले, "शशिकांतने तक्रार दाखल केली आहे की, त्याला जाहिरातींमध्ये केलेल्या दाव्यांप्रमाणे प्रॉपर ट्रेनिंग दिली जात नाहीये. त्याने कंपनीचे डायरेक्टर्स आणि अँबेसेडर ऋतिक रोशनवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आयपीसीच्या कलम 406 आणि 420 अन्वये अभिनेता आणि आणि तीन डायरेक्टर्स मुकेश बंसल, अंकित नागोरी आणि शंमुगावलविरुद्ध तक्रार दाखल केली गेली आहे. याचा तपस सुरु आहे."

बातम्या आणखी आहेत...