आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगावात बसचालक, वाहकाला मारहाण; दीड तास बसेस थांबून कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव - येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच मध्यभागी आडवी लावलेली दुचाकी बाजूला न काढता उलट बस चालक व वाहकालाच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकाने शिवीगाळ करून मारहाण केली. येथील बसस्थानकात शनिवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली. बस वाहक व चालकास मारहाण केल्याचे समजताच स्थानकातील अन्य चालक वाहकांनी संतापाच्या भरात दीड तास बसेस थांबून आंदोलन केले. मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत बस  जागेवरून हलवण्यात येणार नाही, असा पवित्रा घेतला. शेवटी आगारप्रमुख व पोलिस निरीक्षकांनी मध्यस्ती केल्यानंतर चालकांनी बस रस्त्याच्या बाजूला केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. 


माजलगाव बसस्थानकासमोर एकीकडे अतिक्रमणे वाढली आहेत. काही अतिक्रमीत दुकानामध्ये मटका, सोरट असे अवैध धंदे चालत आहेत. त्याचबरोबर बस स्थानकासमोरील मिनी ट्रॅव्हल्स, मार्शल जीप, तीन चाकी अॅपे भरून प्रवाशी वाहतूक करण्यात येते. अवैध चारचाकी वाहने याच ठिकाणी लावले जातात. हातगाड्यासुद्धा बेशिस्तपणे लावण्यात येतात. सध्या नालीचे काम सुरू असल्याने एकरी रस्ता सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता  माजलगाव बसस्थानकातून जीवनापूर मार्गे सिरसाळा ही बस नेहमीप्रमाणे  प्रवाशांना घेवून बसस्थानकाबाहेर येताना  आऊट गेटवर  एका अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या चालकाने आपली दुचाकी बसच्या समोर आडवी लावली. बसचालक  नवनाथ सोपान मुंडे यांनी गेटसमोरील आडवी दुचाकी काढावी म्हणून बसचा हॉर्न वाजवला. तेव्हा अवैध प्रवाशी वाहतूक करणारा चालक  रामेश्वर कुमाजी घायाळ (रा. अशोक नगर) याने चालक मुंडे यांना शिवीगाळ करून त्यांची कॉलर पकडली. त्यानंतर त्यांना धक्काबुक्की करून कपडेही फाडले.

बातम्या आणखी आहेत...