आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीच्या महिलेच्या पाेटातून काढले दीड किलाे खिळे, नट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात डाॅक्टरांनी महिलेच्या पाेटातून चक्क दीड किलाे खिळे व काचेचे तुकडे काढले. यात नट बाेल्ट, सेफ्टी पिना, हेअर पिना, मंगळसूत्र, चेन, अंगठी, बांगड्यांचे तुकडे अादींचा समावेश हाेता. संगीता (४०) असे या रुग्ण महिलेचे नाव असून ती महाराष्ट्रातील शिर्डीची रहिवासी अाहे.

 

ती मानसिक रुग्ण असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पाेटात दुखत असल्याने तिला रुग्णालयात दाखल केले हाेते. येथील डाॅक्टर नितीन परमार यांनी सांगितले, ‘या वस्तू संगीताच्या पाेटातून बाहेर काढण्यासाठी तब्बल अडीच तासांची शस्त्रक्रिया करावी लागली.  अाता ती सुखरूप अाहे.’

बातम्या आणखी आहेत...