आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात देणारे अॅप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक स्तर कुठलाही असला तरी सर्वच महिला मोबाइल वापरतात. शिक्षण, नोकरी, इतर गोष्टींनिमित्त अनेकींना वेळी-अवेळी घराबाहेर पडावे लागते. अशा वेळी त्यांच्या सुरक्षेसाठी काही अॅप तयार करण्यात आले आहे.  आजच्या टेक अपडेटमध्ये त्याबद्दल जाणून घेऊयात.

 

महिलांबाबतच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे  लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. स्त्रियांना आत्मविश्वासाने वावरता यावे यासाठी महिला सुरक्षा अॅप्स उपलब्ध आहेत.जी महिलांसाठी सुरक्षा संरक्षक म्हणून कार्य करतात.  Google Playstore आणि IOS App Store वर उपलब्ध असणारे अॅप, त्यांचं तंत्रज्ञान कसं काम करतं ते जाणून घेऊ. 


Eyewatch SOS -

वापरकर्त्याच्या आसपासचे ऑडिओ आणि व्हिडिओ कॅप्चर करते. इशाऱ्याच्या संदेशासह नोंदणीकृत संपर्काकडे पाठवते.स्थान अचूकतेसाठी यात जीपीआरएस वापरलेले आहे. सुरक्षित स्थानापर्यंत पोहोचल्यानंतर सुरक्षित असल्याचे बटण दाबून जवळच्या लोकांना सूचित करता येते. 


SpotNSave Feel Secure -

दर दोन मिनिटाला प्री-रेकॉर्डेड नंबरवर, स्थानासह अलर्ट संदेश पाठवते. फोन बंद असल्यास वापरकर्ती wristband वापरु शकते, जो अॅपसह येतो. बँडवर प्रेस बटण दिलेले असते.


iGoSafely -

आणीबाणीच्या परिस्थितींत रेकॉर्डेड नंबरवर सतर्ककता संदेश, जीपीएस स्थान पाठवण्याची सोय आहे. अलार्म चालू असल्यास प्रत्येक मिनिट संदेश पाठवला जाईल. हे फोन झटकून किंवा हेडफोन काढून टाकून सक्रिय केले जाऊ शकते.


Smart 24 × 7 -

वापरकर्त्याने बटण दाबल्यास पोलिसांना कॉल जातो. इतर नंबरवर कॉल करण्याचा पर्यायही अॅपवर उपलब्ध आहे. जीपीआरएसची कार्यवाही न झाल्यास, स्थान एसएमएसद्वारे पाठवले जाते. ट्रॅकिंग, चॅटिंग सारख्या वैशिष्ट्यांसह, हे अॅप फोटो देखील क्लिक करते तसेच ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्ड करते. 


BSafe -

अलार्मसह अचूक स्थान आणि ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डेड नंबरवर पाठवते. यातील ‘फॉलो मी’ फीचर जीपीएस ट्रॅकिंगद्वारे वापरकर्त्याचे वर्च्युअल ट्रॅकिंग करते. ‘फेक कॉल’ हे फीचर काही अप्रिय परिस्थितीतून सुटण्यासाठी नकली कॉल करण्याची अनुमती देते. ‘टाइमर अलार्म’ आपल्या अभिभावकांना आपल्याबद्दल माहिती देण्यासाठी स्वयंचलित अॅलॉर्म सेट करते. या व्यतिरिक्त Trakie, My SafetyPin, Shake2Safety, CitizenCop हे सुरक्षा अॅप्स उपलब्ध आहेत.


(लेखिका सायबर सेक्युरीटी सल्लागार आहेत)