आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Hint Of A World end Showing Watch, Starting In 1947; The World Is Only 100 Seconds Behind The Nuclear, Environmental Disaster

1947 पासून सुरू असलेल्या विश्व अंतदर्शक घड्याळाचा इशारा; आण्विक, पर्यावरणाच्या संकटापासून जग केवळ 100 सेकंद मागे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिव्य मराठी विशेष : आण्विक युद्धाचे संकेत देणाऱ्या घड्याळाची सुई 73 वर्षांत प्रथमच सर्वाधिक तणावात
  • शीतयुद्धाच्या काळात या घड्याळाचा काटा मध्यरात्रीपासून 120 सेकंद दूर होता

​​​​​​वॉशिंग्टन : आण्विक युद्ध आणि पर्यावरणाच्या संकटाचे संकेत देणारे जगाच्या अंताचा इशारा देणाऱ्या घड्याळाची अर्थात डूम्सडे क्लॉक'ची सुई शास्त्रज्ञांनी मध्यरात्री १२ च्या १०० सेकंद मागे आणली आहे. डूम्सडे क्लॉकनुसार, मध्यरात्र होण्यासाठी जेवढा कमी काळ राहील तेवढे जग आण्विक व पर्यावरणाच्या संकटाजवळ जाईल. १९४७ पासून हे घड्याळ सुरू आहे. जगावर आण्विक हल्ल्याच्या धोक्याची शक्यता हे घड्याळ वर्तवते. या वेळी या घड्याळाची सुई ७३ वर्षांच्या इतिहासात सर्वात तणावाच्या टप्प्यावर आल्याचे दर्शवण्यात आले आहे. अमेरिका-रशिया शीतयुद्धाच्या काळातही ही सुई मध्यरात्रीपासून १२० सेकंद दूर ठेवण्यात आली होती. मात्र, प्रथमच धोक्याचा हा इशारा देणारी सुई १०० सेकंदांवर ठेवण्यात आली. आण्विक शास्त्रज्ञांचे जे पथक या सुईची जागा ठरवते त्यात १३ नोबेल विजेते शास्त्रज्ञ आहेत.

द बुलेटिन ऑफ अॅटॉमिक सायन्टिस्टचे शास्त्रज्ञ रॉबर्ट रोजनर यांनी गुरुवारी सांगितले, १९४९ मध्ये रशियाने जेव्हा अणुबॉम्बची पहिली चाचणी घेतली तेव्हापासून जगात आण्विक शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरू झाली. तेव्हा या घड्याळात मध्यरात्र १८० सेकंद दूर होती. १९५२ मध्ये अमेरिकेने थर्मोन्युक्लियर उपकरणाची चाचणी घेतली तेव्हा १९५३ मध्ये हे शीतयुद्ध अगदी धोक्याच्या पातळीवर होते. आजच्या काळात तर आण्विक शस्त्रास्त्रांची स्पर्धा प्रचंड वाढली आहे. अमेरिका, चीन आणि रशिया हे तर यात फार पुढे गेले आहेत. त्यांच्यापाठोपाठ इराण, उत्तर कोरियासह इतर देशही आपली आण्विक क्षमता वाढवण्यासाठी धडपडत आहेत.

पहिल्यांदा सुई १२च्या वेळेपूर्वी ४२० सेकंद मागे ठेवली होती

बीएएसने सुरुवातीला या डूम्सडे क्लॉकची सुई मध्यरात्री १२ पासून ४२० सेकंद दूर ठेवली होती. हे घड्याळ आण्विक स्फोटाची कल्पना (मध्यरात्र) आणि शून्याच्या उलटगिणतीचा वापर करते. बीएएसची विज्ञान व सुरक्षा समिती दरवर्षी याबाबतचा धोका लक्षात घेऊन हे घड्याळ अपडेट करते. यात आतापर्यंत १९ वेळा बदल करण्यात आला आहे.