आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

71 वर्षाच्या वृद्धाची संघर्षगाथा, डिग्री पूर्ण करण्यासाठी तब्बल 48 वर्षांनी घेतले अॅडमिशन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सस- असे म्हणतात की, शिक्षणाला काही वय नसते. माणूस जिंवत आहे तोपर्यंत शिकत असतो. असाच एक प्रसंग अमेरिकेतील टेक्सस विद्यापीठात घडला आहे. टेक्सस राज्यात राहणाऱ्या डेविड कार्टर यांनी नुकतेच 'टेक्सस युनिव्हर्सिटीमध्ये' पुन्हा एकदा प्रवेश घेतला आहे. पण असे नाही की, त्यांनी परत प्रवेश घेतला, तर सुमारे 48 वर्षानंतर डेविड आपली पदवी पूर्ण करत आहेत. विद्यापीठाने त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांची फिस भरण्याचा निर्णय घेतला आहे.

 

कार्टर यांना कला आणि लेखनाची आवड असल्यामुळे त्यांनी 1971 मध्ये कला शाखेत प्रवेश घेतला, पण दारू पिल्यानंतर एका काचेच्या खिडकीला धडकून त्यांचा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटनी बसली. कारण त्यांना सीजोफ्रेनिया नावाचा गंभीर आजार झाल्यामुळे शिक्षण सोडावे लागले. यादरम्यान अनेकदा कार्टरची स्मृती गेल्यामुळे ते एका ठिकाणाहूण दुसऱ्या ठिकाणी भटकंती करू लागले आणि बेघर झाले. 


रिसर्च करताना लिहायची आहेत पुस्तके 
टेनासिटीमध्ये पत्रकारीतेच्या शिक्षण घेणाऱ्या रायन चँडलर यांनी कार्टरला पाहिले आणि त्यांचा उपचार केला. त्यामुळे कार्टर आता दुसऱ्या फेरित आपली पदवी घेण्यासाठी विद्यापीठात परत आले आहेत. कार्टन यांनी सांगितले की, त्यांना आता राहिलेले आयुष्य संशोधन आणि पुस्तके वाचण्यात घालवायचा आहे. त्यांना वाटते की, शिक्षण पूर्ण केल्यामुळे पुस्तकांना अधिक चांगल्या पद्धतीने लिहता येतील. तसेच, यादरम्यान बुद्धिमान आणि चांगल्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. 

 

एका असाइनमेंट दरम्यान झाली भेट 
डेविड यांचा उपचार करणारे रायन चँडलर यांनी सांगितले की, माझी आणि कार्टची भेट 'द डेली टेक्सन' या वृत्तपत्रात इंटर्नशिप करताना एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. त्या कार्यक्रमात त्यांनी कार्टची मुलाखत घेतली, यात कार्टरच्या प्रेरणादायी संघर्षाविषयी कळाले. या भेटीमुळे आम्ही लवकरच मित्र झालो. यादरम्यान कार्टन यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मी विद्य़ापीठात प्रवेश घेण्यासाठी त्यांची मदत केली. आता लवकरच कार्टर आपली 'फाइन आर्ट्सची' पदवी संपादन करतील. तसेच, विद्यापीठाने कार्टरसाठी एका सल्लागाराचीही नियुक्ती केली आहे. त्यामुळे कार्टर यांनी चँडलरचे आभार व्यक्त करत म्हणाले की, त्यांना मिळालेले आतापर्यंतचे हे सर्वात मोठे गिफ्ट आहे. त्यांच्याशिवाय मला या सर्व गोष्टी कधीच मिळाल्या नसत्या.