आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबड्डी स्पर्धेसाठी आलेल्या मुंबईच्या खेळाडूचा बुडून मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा : सातारा जिल्ह्यातील नरवणे (ता. माण) येथे गणेशोत्सवादरम्यान भरवण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई येथील कबड्डी संघातून आलेल्या युवकाचा मंगळवारी सकाळी विहिरीत आंघोळ करत असताना बुडून मृत्यू झाला. अविनाश अनंत शिंदे (१७, रा. इंदिरानगर, घाटकोपर, मुंबई) असे मृताचे नाव आहे. अविनाश कबड्डी संघासोबत स्पर्धेत भाग घेण्यासाठी आला होता. मंगळवारी सकाळी अविनाश हा आपल्या सहकाऱ्यांसमवेत नरवणे येथील कॅनॉलमध्ये आंघोळीसाठी गेला होता. परंतु कॅनॉलमधील पाणी गढूळ असल्याने तो सहकाऱ्यांसह बाजूलाच असलेल्या विहिरीत आंघोळीसाठी गेला असता तो विहिरीत खोल पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना यश आले नाही.