आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात अनेक दिवसांपासून घडत होत्या विचित्र घटना, सत्य समोर आले तर भूत प्रेत मानणारेही घाबरून गेले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्युनिच - ज्याप्रमाणे देव आहे त्याचप्रमाणे भुतांचे अस्तित्व देखिल आहे असे मानणाना एक गट आहे. पण शास्त्रज्ञांनी हे पूर्णपणे नाकारलेले नाही. कारण पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर निगेटिव्ह एनर्जीही असेल असे ते म्हणतात. पण जर्मनीतील एका घटनेने पॅरानॉर्मल एक्सपर्ट्स आणि भूत-प्रेतांवर विश्वास असलेल्यांनाही धक्का दिला आहे. हे प्रकरण आहे गोस्लार शहरात तयार करण्यात आलेल्या एका घराचे. येथे एक महिला अनेक वर्षांपासून विचित्र घटनांचा अनुभव घेत होती. 


एका इंग्रजी वेबसाईटनुसार येथे एका निर्जन परिसरात एका महिलेने एक जुने घर भाड्याने घेतले होते. सिंगल मदर असलेली ही महिला तेथे मुलांबरोबर राहत होती. काही दिवस सर्वकाही ठिक होते. पण नंतर काही विचित्र घटना घडल्याने महिला प्रचंड तणावात होती. 


भिंतींमधून यायचा आवाज 
महिलेने सांगितले की, अनेकदा रात्री उशिरा तिला विचित्र स्वप्ने पडायची. ती अनेकदा घाबरून उठायची. अनेकदा तिला भिंतींमधून आवाजही यायचा. तिला वाटले की हा तिचा भ्रम आहे. पण तिच्या मुलांनाही असेच विचित्र अनुभव आले. 

 

मधमाशांनी केला हल्ला 
महिलाने सांगितले की, एक दिवस मधमाशांनी अचानक तिच्यावर हल्ला केला. तिच्याबरोबर नेमके काय होत आहे, हे महिलेला काहीही समजत नव्हते. 

 

कुठेही पडलेले असायचे सामान 
काही दिवसांत या घटनांचे प्रमाण वाढत गेले. रात्री उशिरा घराबाहेर कुणाची तरी काहीतरी हालचाल जाणवत होती. दुसऱ्यादिवशी घराचे सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळायचे. एकदा तर त्यांना एका मुलीची सावली दिसली. या सर्वाने घाबरून महिलेने एका पादरीची मदत घेण्याचा निर्णय घेतला. 


पादरी म्हणाले, तू तिथे जायला नको होते 
गोस्लारच्या चर्चमध्ये जाऊन महिलेने पादरीला सर्व सांगायला सुरुवात केली. तेव्हा पादरीने म्हटले की, त्यांना त्या घराबाबत अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. त्या घरात राहू नये असे पादरी ने सांगितले. महिलेने यामागचे कारण विचारले तेव्हा पादरीने म्हटले, की त्या घरामध्ये जवळपास दोनशेहून अधिक आत्मा आहेत. हे ऐकताच महिला बेशुद्ध झाली. 


अनेक वर्षे बंद होते घर 
महिला शुद्धीत आली तेव्हा तिला सांगण्यात आले की, हे घर अनेक दिवसांपासून बंद होते. कोणी याठिकाणी राहायलाही येत नव्हते. या महिलेने मात्र स्वस्तात घर मिळण्याच्या मोहापायी हे घर घेतले होते. 


काय म्हणतात पॅरानॉर्मल एक्सपर्ट्स
पॅरानॉर्मल एक्सपर्ट्सच्या मते निगेटिव्ह एनर्जी किंवा भूत प्रेत अशा ठिकाणी राहू लागतात ज्याठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी नसते. त्यामुळेच अनेक वर्षांपासून बंद असलेली घरे त्यांचा ठिकाणा बनतात. त्यामुळेच भूत-प्रेतावर विश्वास असलेले लोक सामसूम ठिकाणी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देतात. अनेकदा सामसूम ठिकाणी खूप सुगंध येणे हा त्याठिकाणी आत्मा असण्याचा संकेत असतो. 

बातम्या आणखी आहेत...