आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला लागली होती चायनीज खाण्याची सवय, त्यामुळे वजन झाले 107 किलो; पण डायट न करता घटवले वजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्नेटबाय - इंग्लंड येथे राहणाऱ्या एका महिलेचे वजन आजारामुळे खूपच वाढले आहे. त्यामुळे तिला स्वतःचाच राग येत होता. आजार झाल्यामुळे तिला स्वतःची शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जास्त खाण्याची सवय लागली. दरम्यान तिला चायनीज फूड खाण्याची  सवय लागली. त्यामुळे तिचे वाढून 107 किलोपर्यंत वाढले. पण या महिलेने आपले वजन कमी करण्याचा निश्चय केला आणि डायटींग न करता तिने 45 किलो वजन कमी केले आहे. वर्षभरानंतर महिलेचे वजन फक्त 63 किलो झाले होते.   

 

आजार झाल्यामुळे खात होती जास्त अन्न

> ही गोष्ट बर्नेटबाय शहरात राहणाऱ्या 25 वर्षीय कॅली वाडची आहे. तीन वर्षांपूर्वी प्रेग्नेंसीदरम्यान तिला पोस्च्युरल टॅचीकार्डिया सिंड्रोम नावाचा आजार झाला होता.
> या आजारामुळे तिचे ह्रदय कमजोर झाले आणि तिला वारंवार चक्कर येत होती त्यामुळे तिला अशक्तपणा येत होता. त्यामुळे डॉक्टरांनी शुगर लेवल सामान्य ठेवण्यासाठी जास्तीत जास्त खाण्याचा सल्ला दिला.

> यानंतर महिलेला खाण्यासाठी कारणच मिळाले. जास्त खाल्ल्यामुळे तिचे वजन वेगाने वाढत वर्षभरात 36 किलो वजन वाढले होते आणि लवकरज तिने 107 किलोचा आकडा पार केला. वजन वाढल्यामुळे तिला अडचणी येऊ लागल्या.

> परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर कॅलीने स्वतःला बदलण्याचा निश्चिय केला. तिने आपल्या जेवणाची पद्धत बदलत एकदाच किती मोठे खाण्यापेक्षा थोड्या-थोड्या प्रमाणात खाण्यास सुरूवात केली.
 
> कॅली आधी कधीही खात होती आणि त्याची लिमिट नव्हती. पण नवीन फूड हॅबिटद्वारे तिने दर दोन तासाला थोडे-थोडो खाण्यास सुरूवात केली. कॅलीच्या या प्रयत्नांचा हळूहळू परिणाम दिसत होता आमि वर्षभरातच तिचे वजन 107 किलोवरून कमी होऊन जवळपास 63 किलो झाले. 


समस्येचे मुळ समजली होती कॅली
> कॅलीने सांगितले की, तिच्या वाढत्या वजनाला कमी करण्यासाठी मागील एका वर्षापासून तिचे वजन कमी करण्याबरोबरच तिचे ब्लड शुगर देखील कंट्रोल करून शकेल असा डायट शोधत होती. 

> त्यानंतर महिलेने आपले खाणे-पिणे पूर्णपणे बदलले. आता तिने चायनीज आणि जंग फूड खाणे बंद केले. तिने आता हेल्दी फूड खाणे सुरू केले आहे. ती आता सॅलेड, बटाटे आणि भाजीपाला खाण्याचे प्रमाण वाढवले आहे. 

> महिलेल्या आपल्या छोट्या साइजला व्यवस्थित ठेवण्यासाठी दर दोन तासाला काही ना काही खावे लागते. महिलेने डायट कमी करण्यासाठी एक खास मार्ग काढला आहे. ती लहान प्लेट भरून खाते, ज्यामुळे तिला वाटते की, तिने प्लेटभर जेवण खाल्ले आहे. 

> दर दोन तासाला खाण्यासाठी ती नेहमीच आपल्यासोबत खाद्यपदार्थ ठेवत असते. तिचे म्हणणे आहे की, आता तिला याची सवय झाली आहे. कॅलीने प्रत्येक महिन्यात किमान 3 किले वजस कमी करण्याचे लक्ष ठेवले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...