आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकासोबत लव्ह मॅरेज केले, पण 6 महिन्यांपासून माहेरी राहत होती युवती; पतीने भररस्त्यात केला पत्नीचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोगा (पंजाब) - येथे शुक्रवारी एका व्यक्तीने आपल्याच पत्नीची चाकूने वार करत हत्या केली. या दोघांचा प्रेमविवाह झालाहोता. पण होणाऱ्या वादामुळे पत्नी 6 महिन्यांपासून मुलांसोबत माहेरी राहत होती. पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केला आहे. शेजारील गुरुद्वाराच्या सीसीटीव्ही कॅमरात आरोप कैद झाला आहे. 

 

कंपनीत झाली होती ओळख
मोगा येथील बेदी नगरच्या गल्ली नंबर 3 मधील रहिवासी ज्योती 10-11 वर्षांपूर्वी येथीलच एक कंपनीत काम करत होती. दरम्यान त्याच कंपनीत काम करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथील संजय कुमार या युवकासोबत तिची मैत्री झाली. मैत्री रुपांतर पुढे प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न केले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय कुमारसोबत भांडण होत असल्यामुळे ज्योती गेल्या 6 महिन्यांपासून माहेरी राहत होती. 

 

मुलांना शाळेत सोडण्यासाठी आली असता केला हल्ला
शुक्रवारी सकाळी ज्योती आपल्या मुलांना गोबिंदगड जवळील सरकारी शाळेत सोडण्यासाठी आली होती. मुलांना सोडून परतत असताना संजयने तिची वाट अडवली आणि तिच्यावर चाकूने वार केले. पत्नीचा मृत्यू होत नाही तोपर्यंत संजय चाकूने वार करतच राहिला. घटनेनंतर संजय फरार झाला. 

 

आरोपीविरोधात गुन्हा दाखल 

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी भेट दिली. तेथे ज्योतीचे वडील बिट्टी यांच्या विधानावरून संजयकुमार विरोधात गुन्हा दाखल केला. तर दूसरीकडे घटनेनंतर फरार होणारा आरोपी जवळीच गुरुद्वाराच्या सीसीटीव्हीच्या कॅमेरात कैद झाला आहे. तपासाचा एक भाग म्हणून हे फूटेज पोलिसांनी जप्त केले आहे.