आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाची राहणारी जेड जेनकिन्स नावाच्या महिलेला लोक सोशल मीडियावर धन्यवाद म्हणत आहेत. कारण या महिलवामने घर साफ करण्याची एक नवी अनोखी पद्धत सांगितली आहे. ही महिला भाड्याच्या घरात राहते. ती आपल्या घराच्या फरशीचा रंगच डार्क ग्रे आहे असे समजत होती. मग महिलेने घराच्या फरशीचा सफाई करण्यापूर्वीच फोटो काढला आणि मग खोटे दात साफ करण्याच्या टॅबलेट फरशीवर पाण्यात मिसळून टाकल्या आणि साफसफाई केल्यानंतरचा फोटो फेसबुकवर टाकला. जे पाहून लोक हैराण झाले आहेत. फरशीचा रंग पूर्णपणे बदलला होता.
दोन्ही फोटो वाटत आहेत वेगवेगळ्या घरातील...
- जेड जेनकिन्सने सांगितले, मी आधी आपल्या किचनच्या फरशीचा रंग डार्क ग्रे समाजात होते आणि रोज नॉर्मल सफाई करायचे.
- एक दिवस फारशीला भिजवले आणि थोडे घासले तेव्हा कळले कि ती खूप जास्त घाण आहे.
- मग सफाई करण्याआधीच फोटो काढला आणि मग सफाई करण्यासाठी एका टेबलेटचा वापर केला.
- महिलेने पॉलिसेंट क्लीनरच्या 3 टेबलेट 5 लीटर पाण्यामध्ये मिसळल्या आणि त्याने फारशी साफ केली.
- पॉलिसेंट खोटे दात साफ करण्यासाठीच्या टेबलेट आहेत. ज्या पाण्यात विरघळून जातात. त्याची किंमत केवळ 1.50 पाउंड (जवळपास 150 रुपये) आहे.
- सफाईनंतर पहिले तर फरशीचा रंग पूर्णपणे बदललेला होता. मग तिने सफाई केल्यानंतरचाही फोटो काढला.
- असे वाटत होते की, दोन्ही फोटो वेगवेगळ्या घराचे आहेत.
सफाईनंतर दोन्ही फोटो तिने फेसबुकवर टाकले. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले, 'तुम्ही आज इंटरनेटला जिंकले.' तर दुसरा यूजर म्हणाला, 'हे खूप छान आहे. आधी जे साफ वाटायचे ते आता अजून जास्त साफ दिसते आहे. तिसऱ्या यूजरने घर साफ करण्याची नवी पद्धत सांगितल्याबद्दल धन्यवाद म्हंटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.